महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात उन्मेष पाटलांना 4 लाख 11 हजार तर रावेरात रक्षा खडसेंना 3 लाख 35 हजारांचे मताधिक्क्य - बालेकिल्ला

जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा विषय मिळवत आपला बालेकिल्ला अढळ असल्याचे सिद्ध केले आहे.

विजयी उमेदवार डॉ. उल्हास पाटील

By

Published : May 23, 2019, 11:19 PM IST

जळगाव- जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा विषय मिळवत आपला बालेकिल्ला अढळ असल्याचे सिद्ध केले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातून उन्मेष पाटील हे तब्बल 4 लाख 11 हजार 617 मतांचे तर रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांनीही 3 लाख 35 हजार 882 मतांचे मताधिक्क्य मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले आहे.

प्रतिक्रिया देताना विजयी उमेदवार डॉ. उल्हास पाटील

उन्मेष पाटील यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तथा माजीमंत्री गुलाबराव बाबुराव देवकर यांचा अक्षरशः धुव्वा उडवला. उन्मेष पाटील यांना 7 लाख 13 हजार 874 तर गुलाबराव देवकर यांना 3 लाख 2 हजार 257 मते मिळाली. तिकडे रावेरात खासदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या रक्षा खडसे यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास वासुदेव पाटील यांचा पराभव केला. रक्षा खडसेंना 6 लाख 55 हजार 386 मते मिळाली तर डॉ. उल्हास पाटील यांना 3 लाख 19 हजार 504 मते मिळाली. टपाली मतदानात जळगावातून उन्मेष पाटलांना 1 हजार 744 तर गुलाबराव देवकर यांना 2 हजार 695 मते मिळाली. रावेरात रक्षा खडसेंना 3 हजार 174 तर डॉ. उल्हास पाटलांना अवघी 764 मते मिळाली. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व रावेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी हे निकाल जाहीर केले.

जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी 23 एप्रिलला झालेल्या मतदानाची मतमोजणी आज रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पूर्ण झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील जळगाव मतदारसंघात 14 तर रावेर मतदारसंघात 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, खरी लढत ही भाजप-सेना युती व काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडीत होती. बहुजन वंचित आघाडीने देखील दोन्ही मतदारसंघात आपले उमेदवार दिले होते. मात्र, ते फारशी चमक दाखवू शकले नाहीत.

53 फेऱ्यांमध्ये पार पडली मोजणीची प्रक्रिया

मतमोजणीसाठी जळगाव मतदारसंघासाठी एकूण 29 फेऱ्या झाल्या. तर रावेर मतदारसंघासाठी 24 अशा एकूण 53 फेऱ्यांमध्ये प्रक्रिया पार पडली. सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतमोजणीची प्रक्रिया तब्बल रात्री साडेआठ वाजेपर्यंत म्हणजेच साडेबारा तास चालली. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कोणताही प्रकारचा गोंधळ किंवा अनुचित प्रकार घडला नाही.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना मिळालेली मते अशी

1) उन्मेष पाटील, भाजप - 713874
2) गुलाबराव देबकर, राष्ट्रवादी काँग्रेस - 302257
3) राहुल बनसोडे, बहुजन समाज पार्टी - 3428
4) ईश्वर मोरे, बहुजन मुक्ती पार्टी - 1262
5) अंजली बाविस्कर, वंचित बहुजन आघाडी - 37366
6) संत श्री बाबा महाराज महाहंसाजी, हिंदुस्थान निर्माण दल - 1295
7) मोहन बिऱ्हाडे, राष्ट्रीय समाजवादी पार्टी - 670
8) शरद भामरे, राष्ट्रीय जनशक्ती पार्टी - 817
9) अनंत महाजन, अपक्ष - 6562
10) ओंकार जाधव, अपक्ष - 3144
11) मुकेश कुरील, अपक्ष - 1383
12) ललित शर्मा, अपक्ष - 1108
13) सुभाष खैरनार, अपक्ष - 1629
14) रुपेश संचेती, अपक्ष - 3150

रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना मिळालेली मते अशी

1) डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस - 319504
2) रक्षा खडसे, भाजप - 655386
3) डॉ. योगेंद्र कोलते, बहुजन समाज पार्टी - 5705
4) अजित तडवी, राष्ट्रीय आम जन सेवा पार्टी - 1425
5) रोहिदास अडकमोल, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया - 1679
6) नितीन कांडेलकर, वंचित बहुजन आघाडी - 88365
7) मधुकर पाटील, हिंदुस्थान जनता पार्टी - 1607
8) रोशन अली, इंडियन युनियन मुस्लिम लीग - 1103
9) गौरव सुरवाडे, अपक्ष - 985
10) विजय तंवर, अपक्ष - 1141
11) नजमीन शेख, अपक्ष - 2581
12) डी.डी. वाणी, अपक्ष - 4274

ABOUT THE AUTHOR

...view details