जळगाव - देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. पण, अजूनही जळगाव मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाला योग्य उमेदवार मिळत नाही. काँग्रेसने माजी मंत्री गुलाबराव देवकरांना उमेदवारी दिली आहेत. पण, भाजप अद्याप सक्षम पर्याय देऊ शकले नाही. दुसरीकडे रावेरमध्ये एकनाथ खडसेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगावमधून सलग १० वर्षे खासदार असणारे ए.टी. पाटील यावेळी भाजपची पसंती नाहीत. त्यांना पक्षातूनच विरोध होत आहे. त्यामुळे नवा उमेदवार शोधण्याची पाळी भाजपवर आली आहे. अशातच काँग्रेसने उमेदवार जाहीर करुन पहिला डाव खेळला आहे. भाजपकडून नावांची चाचपणी सुरु आहे. अभियंता प्रकाश पाटील, जिल्हा परिषद सदस्या स्मिता वाघ आणि गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन यांची नावे चर्चेत आहेत. यातील प्रकाश पाटील यांना पक्षाकडून निरोप गेल्याचेही सांगण्यात येत आहे. पण, अजून कुठल्याही नावावर शिक्कामोर्तब झाले नाही.