महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात भाजप कार्यकर्त्याचा जल्लोष करताना हवेत गोळीबार; व्हिडिओ व्हायरल

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतल्यानंतर शनिवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना पुतळ्याच्या चबुतऱ्यावर असतानाच तेथून एका कार्यकर्त्याने पिस्तुलने हवेत गोळीबार केला. या गोळीबाराचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

By

Published : Nov 24, 2019, 3:36 PM IST

जळगाव राजकारण

जळगाव - मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतल्यानंतर शनिवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना पुतळ्याच्या चबुतऱ्यावरून एका कार्यकर्त्याने रिव्हॉल्वरने हवेत गोळीबार केला. या गोळीबाराचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.


देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी जिल्ह्यातील पाचोऱ्यात देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करून जल्लोश केला. मात्र, या जल्लोषाच्या वेळी एका कार्यकर्त्याने हवेत गोळीबार केल्याने वातावरण तापले आहे. असून यावेळेसचा एक व्हिडिओ ही चांगलेच व्हायरल होत आहे.

हेही वाचा -मी अजित पवारांसोबतच... राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार अनिल पाटलांचा खुलासा

दरम्यान, या विषयासंदर्भात पाचोरा येथील पोलीस उपाधीक्षक ईश्वर कातकाडे यांना विचारले असता, प्राथमिक तपासात संबंधित व्यक्ती निष्पन्न झाली असून त्याच्या शोधासाठी एक पथक पाठविण्यात आले आहे. त्याच्याकडे पिस्तूलाचा परवाना असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, चौकशीतच पिस्तुल कोणते व परवाना आहे का? हे निष्पन्न होईल, अशी माहिती कातकाडे यांनी दिली. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना विचारले असता पाचोरा पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अशा पध्दतीने हवेत गोळीबार करता येतो का? या प्रश्नावर डॉ. उगले यांनी चौकशीनंतर स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकारासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा - धरसोड वृत्तीमुळे शिवसेनेची 'ही' अवस्था - एकनाथ खडसे

ABOUT THE AUTHOR

...view details