महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 19, 2019, 1:17 PM IST

ETV Bharat / state

एकनाथ खडसेंच्या संपर्क कार्यालयावरील भाजपचे बॅनर हटवले, खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण

भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरातील संपर्क कार्यालयावर असलेले भाजपचे बॅनर काढण्यात आले आहेत. पक्षाचे ब‌ॅनर हटवल्यामुळे खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण आले आहे.

BJP party banner removed from Eknath Khadse's liaison office
एकनाथ खडसेंच्या संपर्क कार्यालयावरील भाजपचे बॅनर हटवले

जळगाव -भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. आज गुरूवारी सकाळी नागपुरात खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात भेट झाल्याचे वृत्त आले. त्यात दुसरीकडे खडसेंच्या मुक्ताईनगर मतदारसंघातील संपर्क कार्यालयावरील भाजपचे बॅनर हटवण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांमुळे खडसे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

मुक्ताईनगर येथील एकनाथ खडसेंच्या संपर्क कार्यालयावरील भाजपचे बॅनर हटवले...

हेही वाचा... विधान परिषदेच्या कामकाजचा चौथा दिवस, लक्षवेधीने होणार महत्वाच्या विषयावर चर्चा

एकनाथ खडसे हे भाजपच्या राज्य नेतृत्त्वावर प्रचंड नाराज आहेत. त्यांनी गोपीनाथ गडावर पक्षांतराचे संकेत दिले होते. तत्पूर्वी खडसेंनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीनंतर खडसेंनी आपण भाजप सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र आता पुन्हा खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण आले आहे. गुरूवारी सकाळी त्यांनी नागपुरात शरद पवारांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. या भेटीत त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची खात्रीशीर माहिती आहे.

हेही वाचा... नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मुंबईकर आज रस्त्यावर उतरणार; मुंबई पोलीस सज्ज

याच पार्श्वभूमीवर खडसेंच्या मुक्ताईनगर मतदारसंघातील संपर्क कार्यालयावर असलेले भाजपचे बॅनर काढण्यात आले आहेत. त्यामुळे खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाविषयी चर्चा सुरू झाली आहे. संपर्क कार्यालयावरील काढण्यात आलेल्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ खडसे यांच्यासह भाजपचे निशाण होते.

ABOUT THE AUTHOR

...view details