जळगाव -गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेली ईडी आणि सीडी बाबतची चर्चा आता जुनी झाली आहे. मात्र, आता ईडी लागली असल्याने त्यांनी आता सीडी दाखवावी, असे थेट आव्हान भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना दिले आहे.
हेही वाचा -महाराष्ट्राच्या राज्यपालांमुळे उत्तराखंडमध्ये तापले राजकारण, जाणून घ्या नेमके कारण
भाजप नेते गिरीश महाजन व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात मागील वर्षापासून ईडी व सीडीच्या मुद्द्यावरून जुगलबंदी सुरु आहे. काल एकनाथ खडसे यांनी माझी ईडीची चौकशी सुरु आहे. त्यामुळे मी म्हटल्यानुसार योग्य वेळ आल्यावर सीडी लावणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्याच अनुषंगाने आज भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंवर पलटवार केला आहे. आज सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा ते बोलत होते.
- आता समजेल योग्य वेळ कोणाची येते ते?