महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेगा भरतीमुळेच भाजपने सरकार घालवले; एकनाथ खडसेंनी पुन्हा डागली तोफ! - eknath khadse jalgaon latest news

मेगा भरतीमुळे भाजपला विधानसभा निवडणुकीत 220 पेक्षा जास्त जागा सहज मिळतील, असे पक्षश्रेष्ठींना वाटत होते. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना निर्णय प्रक्रियेत डावलले काय आणि त्यांना तिकीट नाकारले काय? काही फरक पडत नाही, अशी भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली, अशी खंत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

ekanath khadse (senior bjp leader)
एकनाथ खडसे (ज्येष्ठ भाजप नेते)

By

Published : Jan 18, 2020, 4:59 PM IST

Updated : Jan 18, 2020, 5:07 PM IST

जळगाव -मेगा भरतीमुळेच माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना फटका बसला तसेच शिवाय भाजपने सरकार घालवले. मेगा भरतीचा निर्णय चुकीचाच होता, अशा शब्दांत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा भाजपला घरचा आहेर देत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. खडसे आज (शनिवारी) येथील त्यांच्या 'मुक्ताई' निवासस्थानी पत्रकारांसोबत बोलत होते.

एकनाथ खडसे (ज्येष्ठ भाजप नेते)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खडसे पुढे म्हणाले, भाजपने लोकसभा निवडणुकीच्या काळात मेगा भरतीला सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीच्या काळात या मेगा भरतीला जोर आला. भाजपने मेगा भरतीच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आपल्याकडे ओढले. मात्र, ही मेगा भरती करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्यांवर आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांच्या विरोधात सतत दंड थोपटले, अशा नेत्यांनाच स्थान देण्यात आले.

हेही वाचा -वयाच्या ९७ व्या वर्षी निवडणुकींच मैदान गाजवत आजीबाई बनल्या सरपंच

याठिकाणी भाजपच्या राज्य नेतृत्वाने आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. मेगा भरतीमुळे भाजपला विधानसभा निवडणुकीत 220 पेक्षा जास्त जागा सहज मिळतील, असे पक्षश्रेष्ठींना वाटत होते. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना निर्णय प्रक्रियेत डावलले काय आणि त्यांना तिकीट नाकारले काय? काही फरक पडत नाही, अशी भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली. त्यानंतर मेगा भरतीत आयात केलेल्या नेत्यांना तिकिटांची खैरात वाटली. मात्र, प्रत्यक्ष उलटे झाले. ज्यांना भाजपने तिकिटे वाटली त्यांना जनतेने साफ नाकारले. मेगा भरतीचा फटका फक्त पक्षालाच नाही तर माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना देखील बसला आहे, असेही खडसे म्हणाले.

मेगा भरतीचे मूळ आताच्या सरकारमध्ये -

भाजपने केलेल्या मेगा भरतीचे मूळ आताच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आहे. या सरकारमधील नेत्यांना जर भाजपने आपल्या मेगा भरतीत स्थान दिले असते तर चित्र काहीसे निराळे राहिले असते. मात्र, दुर्दैवाने तसे झाले नाही, असेही यावेळी खडसे म्हणाले. भाजपला आता आपल्या निर्णयाची चूक लक्षात आल्यानेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली अशी प्रतिक्रिया दिली आहे. पुढे पक्ष आपली भूमिका बदलेल, असा चिमटा देखील त्यांनी काढण्याची संधी सोडली नाही.

हेही वाचा -महाराष्ट्रातील सरकार दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही - उद्धव ठाकरे

संजय राऊतांवर टीकास्त्र-

यावेळी खडसेंनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर देखील टीकास्त्र डागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडून पुरावे मागणे चुकीचेच नाही तर हा शुद्ध मूर्खपणा आहे. राऊत यांनी असे वक्तव्य करायला नको होते, असेही खडसेंनी यावेळी सांगितले. दरम्यान, पीकविमा कंपनीच्या मुद्यावरही त्यांनी मत मांडले.

Last Updated : Jan 18, 2020, 5:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details