महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'राहिले ते मावळे, उडाले ते कावळे'; भाजपच्या गळतीवर नेते गिरीश महाजनांनी सोडले मौन - BJP MP Raksha Khadse

महाविकास आघाडीची सत्ता येताच मंत्री व नेत्यांकडून नगरसेवकांना आमिष देऊन, दबावतंत्राचा वापर करत पक्षांतर करण्यास भाग पाडले जात आहे, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारच्या विरोधात भाजपच्या वतीने गुरुवारी आक्रोश आंदोलनानंतर ते बोलत होते.

भाजप नेते गिरीश महाजन
भाजप नेते गिरीश महाजन

By

Published : Jun 4, 2021, 8:15 AM IST

जळगाव- महापालिका व मुक्ताईनगर नगरपंचायतीचे काही भाजप नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. भाजपला लागलेल्या गळतीवर गिरीश महाजन यांनी मौन सोडत पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. 'राहिले ते मावळे, उडाले ते कावळे. महाविकास आघाडीची सत्ता येताच मंत्री व नेत्यांकडून नगरसेवकांना आमिष देऊन, दबावतंत्राचा वापर करत पक्षांतर करण्यास भाग पाडले जात आहे', असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारच्या विरोधात भाजपच्या वतीने गुरुवारी आक्रोश आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यातील खडसे यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीबद्दलही भूमिका मांडली.

भाजपच्या गळतीवर नेते गिरीश महाजनांनी सोडले मौन

'ती' भेट फक्त म्हणजे औपचारिकता

रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. आपल्या मतदारसंघात दौरा असल्याने त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चहापानाचे निमंत्रण दिले होते. म्हणून आम्ही त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. ही औपचारिकता असून, त्यात कोणत्याही प्रकारचा राजकीय संकेत नसल्याचे महाजन यांनी सांगितले. दरम्यान, फडणवीस व खडसे यांचे फोनवर एकमेकांशी बोलणे झाल्याबद्दल आपणास काही माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात कोणीही राजकारण करू नये - मंत्री छगन भुजबळ

ABOUT THE AUTHOR

...view details