जळगाव -भाजप नेते तथा माजीमंत्री गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपासून त्यांना ताप जाणवत होता. त्यानंतर त्यांनी खबरदारी म्हणून कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. प्रकृती स्थिर असल्याने ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या जामनेरातील राहत्या घरीच क्वारंटाईन झाले आहेत.
याआधी पत्नी आणि कन्येलाही झाला होता कोरोना-
गिरीश महाजन यांच्या पत्नी तथा जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांनादेखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. नंतर त्यांच्या कन्येलाही कोरोना झाला होता. आता गिरीश महाजन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 8 दिवसात संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले आहे.