महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप नेते गिरीश महाजनांना करायचंय चित्रपटात काम, निर्मात्याला म्हणाले, एक संधी द्या! - halgat movie poster promotion jamner

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भाजप नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत 'हलगट' या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रमोशन करण्यात आले. यावेळी भाषणात ते बोलत होते. आपल्या भाषणात गिरीश महाजनांनी कोटी करत उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले.

bjp leader girish mahajan
भाजप नेते गिरीश महाजन

By

Published : Oct 16, 2021, 2:42 PM IST

Updated : Oct 16, 2021, 3:13 PM IST

जळगाव -आपल्या बेधडक स्वभावामुळे सातत्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत राहणारे भाजप नेते गिरीश महाजन यांनी एक अनोखी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आहेत. 'आपली आमदारकीची सहावी टर्म असून, आता यापुढे जर पक्षाने उमेदवारी दिली नाही तर आम्हाला एखाद्या चित्रपटात भूमिका करण्याची संधी द्या', अशी मागणी त्यांनी एका चित्रपट निर्मात्याकडे केली आहे.

याबाबत बोलताना भाजपचे नेते गिरीश महाजन

जामनेरला झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केली इच्छा -

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भाजप नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत 'हलगट' या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रमोशन करण्यात आले. यावेळी भाषणात ते बोलत होते. आपल्या भाषणात गिरीश महाजनांनी कोटी करत उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले.

हेही वाचा -'मोदींना सांगणार, लोक तुम्हाला शिव्या देतात' - खासदार संजय राऊत

नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?

गिरीश महाजन यांनी भाषण करताना सांगितले की, अजितदादा, सुधीर मुनगंटीवार, जयंत पाटील, विखे पाटील व माझी आता आमदारकीची सहावी टर्म आहे. सलग 30 वर्षे आमदारकी भूषवल्याने पक्ष एकाच व्यक्तीला किती वेळा संधी देणार? पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्हाला रिटायरमेंट घ्यावीच लागेल. मग अशा वेळी काय करायच? त्यामुळे भविष्यात आम्हालाही आपल्या चित्रपटात एखादी भूमिका करण्याची संधी द्या, अशी मागणी गिरीश महाजन यांनी हलगट चित्रपटाच्या निर्मात्याकडे केली.

तुम्हाला इंग्रजी चित्रपटात देतो संधी...

गिरीश महाजन यांनी चित्रपटात भूमिका देण्याची मागणी केल्यानंतर चित्रपट निर्माते बाबुराव घोंगडे यांनीही कोटी करत, तुमच्यासाठी इंग्रजी चित्रपट काढून त्यात काम करण्याची संधी देईन, असे सांगितले. त्यामुळे उपस्थितांमध्ये हास्याची लहर उमटली.

Last Updated : Oct 16, 2021, 3:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details