जळगाव- गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते तथा माजीमंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. आता या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांनी आपल्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे दिला आहे. आता ते येत्या शुक्रवारी (23 ऑक्टोबर) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषेदत दिली. मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा होणार असल्याचे बोलले जात आहे.
ईटीव्ही भारतशी बोलताना एकनाथ खडसे यांनी आजच पक्षाचा राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे खडसेंच्या राष्ट्रावादी प्रवेशावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ईटीव्ही भारतने खडसे राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते.
या कारणाने होते नाराज -
भाजपचे ज्येष्ठे नेते आणि उत्तर महाराष्ट्रातील वजनदार राजकारणी एकनाथ खडसे यांनी आज अखेर राजीनामा दिला आहे. २०१४ मध्ये युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर जबाबदार पदावर असलेल्या एकनाथ खडसे यांना भूखंड घोटाळा प्रकरणी राजीनामा देण्याची वेळ आली. त्यानंतर त्यांचे पक्षात खच्चीकरण करण्यात आले. एवढेच नाही तर २०१९ च्या निवडणूक प्रक्रियेतून त्यांना बाहेर ठेवण्यात आले.
एकनाथ खडसे यांनी पक्षासाठी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्रात भाजप पक्षवाढीसाठी एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी अथक प्रयत्न केले होते. मात्र, खडेस यांनाच अखेर तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. मात्र, खडेंसाना भाजपने मुलीस तिकीट देण्याचे मान्य करत पुन्हा एकदा डावलेले. अंतर्गत राजकारणातून पक्षातून बाहेर फेकले गेलेल्या खडसेंनी माझा गुन्हा काय आहे? हे तरी सांगा अशी वारंवार विचारणा पक्षाकडे केली. मात्र, फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपने त्यांना लांब ठेवण्यात यश मिळवले.