महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'फडणवीस अजित पवारांवर टीका करूच शकत नाही, कारण आम्ही त्यांच्यासोबत चार दिवसांचा संसार केलाय'

एकनाथ खडसे शनिवारी दुपारी आपल्या मुक्ताईनगर येथील फार्म हाऊसवर पत्रकारांशी बोलत होते. खडसेंनी यावेळी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. आपल्या वाढदिवसानिमित्त तीन दिवसांपूर्वी आयोजित छोटेखानी कार्यक्रमापासून खडसेंनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्यावर पक्षाकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध ते पेटून उठले आहेत.

photos
संग्रहित छायाचित्र

By

Published : Sep 5, 2020, 9:50 PM IST

Updated : Sep 5, 2020, 10:57 PM IST

जळगाव -विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका-टिप्पणी करूच शकत नाही. कारण आम्ही (देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून) सर्व तत्त्व, सत्त्व विसरून त्यांच्यासोबत चार दिवसांचा संसार केला आहे. मुहूर्त साधला, लग्न केले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. तीन, चार दिवस एकत्र राहिलो. चार दिवस दुसऱ्याच्या घरात राहून तुम्ही पतीव्रता कसे राहू शकतात? तुम्ही नैतिकता हरवली आहे, असा घणाघाती आरोप करत माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

एकनाथ खडसे

एकनाथ खडसे शनिवारी दुपारी आपल्या मुक्ताईनगर येथील फार्म हाऊसवर पत्रकारांशी बोलत होते. खडसेंनी यावेळी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. आपल्या वाढदिवसानिमित्त तीन दिवसांपूर्वी आयोजित छोटेखानी कार्यक्रमापासून खडसेंनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्यावर पक्षाकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध ते पेटून उठले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत त्यांनी घणाघाती आरोपांचे सत्र सुरू केले आहे. पक्षाने आता दखल घेतली नाही तर आपण आपला अंतिम निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. यावेळी ते म्हणाले की, पूर्वी पक्षात स्व. गोपीनाथ मुंडे आक्रमक शैलीत बोलायचे. दुसऱ्या बाजूला भाऊसाहेब फुंडकर यांची तोफ चालायची. तिकडे नागपूरला गेले तर नितीन गडकरी यांचा तोफखाना एकदम जोरात चालायचा. इकडे गिरीश बापट, विनोद तावडे, पंकजा मुंडे मी स्वतः तसेच हरिभाऊ बागडे असे अनेक नेते सरकारविरोधात आवाज उठवत असत. त्यावेळी सरकार गांगरून जायचे. एकदम हादरून जायचे. मात्र, आता महाराष्ट्रात सर्व नेतेमंडळी गुपचूप बसले आहेत. सुधीर मुनगंटीवार कुठे आहेत, पंकजा मुंडे काही बोलत नाही. तुम्ही निवडून दिलेले जे पदाधिकारी आहेत, चंद्रकांत पाटील यांच्यासह ते कधीतरी बोलतात. आताच्या घडीला सरकारविरोधात आक्रमक भाषा पाहिजे, त्यात आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे सांगत खडसेंनी फडणवीस यांच्या नेतृत्त्वावरच शंका उपस्थित केली आहे.

दोषींवर कारवाई केली नाही तर पुढे पाऊल उचलणार-

माझ्या मुलीला विधानसभेत पाडण्यासाठी कोणी प्रयत्न केला, तेही पुरावे मी वरिष्ठांना दिले आहेत. माझा काही गुन्हा असेल तर शिक्षा करा, भ्रष्टाचार केला असेल, तर कडक शिक्षा करा, चूक झाली असेल तर ते सांगा. माझ्यावर अन्याय का? मी काय गुन्हा केला आहे? याची उत्तरे पक्षाकडे मी मागणार आहे. कोरोना संसर्गानंतर दोषींवर कारवाई झाली नाही तर राजकीय क्षेत्रात पुढील पाऊल उचलणार आहे, असा निर्वाणीचा इशाराही एकनाथ खडसे यांनी दिला आहे.

Last Updated : Sep 5, 2020, 10:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details