महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपच्या उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठकीला एकनाथ खडसेंची दांडी?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील विभागनिहाय आढावा घेण्याचे काम सुरू असून त्यानिमित्ताने उत्तर महाराष्ट्रातील पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी जळगावमध्ये बैठक पार पडत आहे. मात्र, एकनाथ खडसेंनी या बैठकीला दांडी मारली की काय, अशी चर्चा सुरू आहे.

jalgaon
उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठक

By

Published : Dec 7, 2019, 1:52 PM IST

जळगाव- भाजपतील पक्षांतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर आज जळगावात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक होत आहे. निर्धारित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिराने सुरू झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी अनुपस्थिती आहे. खडसेंनी या बैठकीला दांडी मारली की काय, अशी चर्चा सुरू आहे.

जळगावात भाजपच्या उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठकीला सुरूवात

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, माजीमंत्री गिरीश महाजन, सुभाष भामरे, जयकुमार रावल, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील आदींची उपस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपकडून पक्षसंघटन बळकटीसाठी चाचपणी सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील विभागनिहाय आढावा घेण्याचे काम सुरू आहे.

ठाणे, कोकण, पुणे आणि विदर्भानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील पक्षसंघटनेचा आढावा घेतला जाणार आहे. संघटनात्मक निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी हितगुज साधले जात असल्याची माहिती बैठकीच्या प्रारंभी चंद्रकांत पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली. या बैठकीला माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. दरम्यान, एकनाथ खडसेंच्या अनुपस्थितीविषयी त्यांनी स्पष्ट बोलणे टाळले.

ABOUT THE AUTHOR

...view details