महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील सत्ता बदलाचे वारे.. जळगावात भाजप नगरसेवकांचा मोठा गट सेनेच्या संपर्कात

राज्याच्या राजकारणात नुकत्यात घडलेल्या घडामोडींनुसार भाजपला दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने एकत्र येत महाविकासआघाडीची स्थापन करून सत्ता स्थापन  केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. राज्याच्या राजकारणात घडलेल्या या समीकरणाचा परिणाम जळगावातील महापालिकेच्या राजकारणावर देखील झाला.

bjp-corporator-contact-in-sena-in-jalgoan
जळगाव महापालिका

By

Published : Dec 3, 2019, 7:01 PM IST

जळगाव-राज्याची सत्ता हातून गेल्याने जळगाव महापालिकेच्या सत्ताधारी भाजप नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. दुसरीकडे गेल्या १४ महिन्यात शहरात ठोस विकासकामे झालेली नाहीत. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना सोडून भाजपत गेलेले नगरसेवक आता पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर आहेत. दरम्यान, शिवसेनेला फोडाफोडीचे राजकारण करायचे नाही, मात्र, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना योग्य वेळी निर्णय घेईल, अशी भूमिका शिवसेनेचे महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी मांडली. त्यामुळे महापालिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा-अंबरनाथच्या शासकीय रुग्णालयातील भयाण वास्तव : रुग्णांना कालबाह्य औषधं दिल्यानं १० रुग्ण अत्यवस्थ

राज्याच्या राजकारणात नुकत्यात घडलेल्या घडामोडींनुसार भाजपला दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने एकत्र येत महाविकासआघाडीची स्थापन करून सत्ता स्थापन केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. राज्याच्या राजकारणात घडलेल्या या समीकरणाचा परिणाम जळगावातील महापालिकेच्या राजकारणावर देखील झाला. महापालिकेत विरोधीपक्ष असलेल्या शिवसेनेकडून सत्ताधारी भाजपचा एका मोठा गट फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे महापालिका विरोधीपक्ष नेते सुनील महाजन यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना गटनेते अनंत जोशी, महानगराध्यक्ष शरद तायडे देखील उपस्थित होते. यावेळी सुनील महाजन यांनी सांगितले की, विकासकामे होत नसल्याने सत्ताधारी भाजप नगरसेवकांमध्ये अस्वस्थता असली तरी शिवसेना आगामी काळात फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. मात्र, भाजपने शिवसेनेतून पळवून नेलेले नगरसेवक परतीच्या मार्गावर आहेत. शिवसेना योग्य वेळी आपली भूमिका जाहीर करेल, असे सांगत महाजन यांनी उत्सुकता ताणून धरली आहे.

आमदार सुरेश भोळेंवर टीका-

शहराचे आमदार सुरेश जैन असताना भाजपकडून नवीन उद्योग येऊ दिले जात नसल्याचा आरोप केला जात होता. परंतु, गेल्या पाच वर्षात विद्यमान आमदार सुरेश भोळेंनी कोणता नवीन उद्योगशहरात आणला? याचा खुलासा करावा. वास्तविक आमदार भोळे ज्या पक्षाचे आहेत, त्यांचेच राज्यात व केंद्रात सरकार होते मग ते का कमी पडले. माजी आमदार जैनांच्या विरोधात अपप्रचार करून सत्तेत आल्यानंतर आपण शहरासाठी काय केले. हे त्यांनी जाहीर करावे, अशी मागणी गटनेते अनंत जोशी यांनी केली. भाजपने जाहीर केलेल्या १०० कोटी रुपयांपैकी एक दमडी देखील महापालिकेला प्राप्त झालेली नाही. जो निधी खर्च होऊ शकला नाही.तो देखील परत जाण्याची शक्यता आहे. ७५ कोटींच्या साफसफाईच्या योजनेचा बोजबारा उडाला आहे. भुयारी गटारींचे काम सुरू झालेले नाही. एलईडी लाईट योजनेचा फज्जा उडाला असल्याची टीका देखील यावेळी जोशींनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details