महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव पालिकेच्या उपमहापौरपदी सुनील खडके बिनविरोध - सुनिल खडके बिनविरोध उपमहापौर

जळगाव महापालिकेच्या उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजपचे उमेदवार सुनिल खडके हे बिनविरोध निवडणूक आले आहेत. खडके यांच्या व्यतिरीक्त अन्य कोणताही अर्ज दाखल न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सुनील खडके यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली.

Jalgaon Municipal Corporation
जळगाव पालिकेच्या उपमहापौरपदी सुनील खडके बिनविरोध

By

Published : Nov 11, 2020, 5:25 PM IST

Updated : Nov 11, 2020, 5:43 PM IST

जळगाव- महानगर पालिकेच्या उपमहापौरपदी बुधवारी झालेल्या निवडप्रकियेत सुनील खडके यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सुनील खडके यांना केवळ चार महिन्यांचा कार्यकाळ मिळणार असून, या चार महिन्यात शहरात मनपातंर्गत सुरू असलेल्या कामांची गती वाढविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचा विश्वास सुनील खडके यांनी यावेळी व्यक्त केला.

मंगळवारी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करताना सुनील खडके यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने, त्यांची निवड बिनविरोधच मानली जात होती. बुधवारी मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात जिल्हाधिकारी तथा निवडणूक पिठासीन अधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी आयुक्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते. खडके यांच्या व्यतिरीक्त अन्य कोणताही अर्ज दाखल न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सुनील खडके यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली. यावेळी महापौैर भारती सोनवणे यांनी खडके यांना पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी नवनिर्वाचित उपमहापौरांचा सत्कार केला.

जळगाव पालिकेच्या उपमहापौरपदी सुनील खडके बिनविरोध
मनपाचे ११ वे उपमहापौरसुनील खडके हे जळगाव महापालिकेचे अकरावे तर भाजपचे दुसरे उपमहापौर ठरले आहेत. तसेच नगरसेवकाच्या पहिल्याच टर्ममध्ये उपमहापौर झालेले सुनील खडके हे चौथे नगरसेवक ठरले आहेत. याआधी अब्दुुल करीम सालार, रमेशदादा जैन, राखी सोनवणे हे पहिल्याच टर्ममध्ये उपमहापौर झाले होते. अनेक वर्षांपासून खडके हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. खडके झाले भावूकउपमहापौरपदाची औपचारिक घोषणा झाल्यानंतर सुनील खडके भावूक झाले होते. खडके यांनी आपले वडील वामन खडके यांना सभागृहातच साष्टांग नमस्कार केला. यासह आयुक्तांचीही भेट घेत सहकार्य करण्याचे आवाहन केले. खडके यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी मात्र सोशल डिस्टन्सिंगचा पुर्णपणे फज्जा उडालेला पहायला मिळाला. आमदार सुरेश भोळे यांनी देखील खडके यांचे अभिनंदन केले. जळगावकरांचे प्रश्न हेच माझे प्रश्न- खडकेपक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थकी लावण्याचा प्रयत्न चार महिन्यांचा कार्यकाळात करणार आहे. माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे यांचे मनापासून आभार तसेच जळगावकरांचे प्रश्न हेच माझे प्रश्न याच हेतुने जो काही कार्यकाळ मिळाला आहे. त्यात काम करण्याचा प्रयत्न राहणार आहे. असे सुनील खडके यांनी यावेळी सांगितले.
Last Updated : Nov 11, 2020, 5:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details