जळगाव:जल, जंगल आणि जमीनीवर आदिवासींचा अधिकार आहेचं. पण, त्याचबरोबर शिक्षण (Education) आणि आरोग्यावर (Helath) आदिवासींचा (tribals) जन्मजातचं अधिकार आहे. तो त्यांना मिळालाच पाहिजे असे राहुल गांधी म्हणाले. ते भारत जोडो (Bharat jodo yatra) यात्रेदरम्यान जळगावात बोलत होते. आदिवासी हे देशाचे मालक आहेत पण त्यांचे मालकी हक्क मिळू नयेत ते आदिवासी नाही तर कायम जंगलातच रहावेत म्हणून त्यांना वनवासी संबोधून त्यांची खरी ओळख पुसण्याचे काम भाजपा करत आहे. असा आरोप राहूल गांधींनी (Rahul Gandhi) केला.
जळगाव जामोदमध्ये हजारो आदिवासी कष्टकरी महिलांसमोर राहुल मेळाव्यात बोलत होते. राहुल पुढे म्हणाले की, आदिवासींची संस्कृती, इतिहास देशासाठी महत्वाचा आहे. पर्यावरणाशी तुमचे नाते घट्ट आहे. आणि ते महत्वाचे आहे. आदिवासींची भाषा, कपडे व जगण्याचा अंदाज वेगळा आहे. पण तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे नाहीत, आपण सर्वजण एक आहोत.
आदिवासींसाठी वन हक्क कायदा (Forest Rights Act for Tribals) काँग्रेसने दिला. पण ती काही तुम्हाला भेट दिलेली नाही तर तो तुमचा हक्क आहे. अधिकारच आहे. तुमचा हक्क आहे तोच काँग्रेस सरकारने तुम्हाला दिला. या जमिनीवर पहिले पाऊल आदिवसांनी टाकले. पण पंतप्रधान आदिवासींसाठी नवा शब्द वनवासी उच्चारतात. आदिवासी व वनवासी या दोन शब्दांचा अर्थ वेगळा आहे. आदिवासी मालक आहेत तर वनवासी म्हणजे जंगलामध्ये राहणारा म्हणजेच शहरात राहू न शकणारा, शिक्षण न मिळू शकणारे, जंगल संपले तर तुमचे अस्तित्वही संपेल आणि पंतप्रधान तुमच्या हक्काचे जंगल काही उद्योगपतींना देत आहेत. तुमच्या अस्तित्वावर घाला घातला जात आहे. असा आरोप राहुल गांधींनी मोदींवर (PM Narendra Modi) केला.
भाजपवर घणाघात- काँग्रेस पक्षाने महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षण देऊन राजकारणात महिलांना प्रतिनिधित्व दिले. महिला, आदिवासी, दलित, वंचित समाज घटकाला न्याय देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. भाजपाचा मुली, महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. बलात्काराला मुलींचे कपडे जबाबदार असल्याचे सांगत मुलींनाच चूक ठरवले जाते. बलात्कार कपड्यांमुळे होत नाहीत. त्यात मुलीची चुक नसते. जर कोणी गुन्हेगार असेल तर तो बलात्कारी. भाजपावाले महिलांचा सन्मान न करता त्यांचा अपमान करतात. अशा शब्दांत राहुल गांधींनी भाजपचा समाचार घेतला.
या मेळाव्याला मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री खा.दिग्विजयसिंह, महिला काँग्रेस अध्यक्ष नेट्टा डिसुजा, प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, योगेंद्र यादव आदी मान्यवर उपस्थित होते.