जळगाव -'वाढदिवस' हा नुसता शब्द जरी उच्चारला तरी आपल्या चेहऱ्यावर आनंदाची लहर येते... एखाद्या कार्यक्रमाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते... सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा होतो. परंतु, जळगाव जिल्ह्यात एक गाव असे आहे, ज्याठिकाणी चक्क झाडांचा वाढदिवस साजरा केला जातो. विशेष म्हणजे, झाडांचा वाढदिवस साजरा करताना सेंद्रिय खतापासून तयार केलेला केकही कापला जातो. नंतर या केकचे तुकडे झाडांना खत म्हणून टाकले जातात. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने हा नाविन्यपूर्ण उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून राबवला जात आहे.
काय सांगता 'वाढदिवस' तो पण झाडांचा? जळगाव जिल्ह्यातील घुमावल गावाची आदर्शवत कहाणी! - Ghumawal village news
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील घुमावल बुद्रुक या गावात हा नाविन्यपूर्ण उपक्रम लोकसहभागातून राबवला जात आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षारोपणाचे खूप महत्त्व आहे, हीच बाब लक्षात घेऊन घुमावलच्या ग्रामस्थांनी तीन वर्षांपूर्वी एकत्र येत वृक्षारोपणाची चळवळ सुरू केली.
हेही वाचा -राष्ट्रीय आरोग्य मिशन : नियुक्त्यांमध्ये 400 कोटींचा गैरव्यवहार, फडणवीसांचा आरोप
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील घुमावल बुद्रुक या गावात हा नाविन्यपूर्ण उपक्रम लोकसहभागातून राबवला जात आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षारोपणाचे खूप महत्त्व आहे, हीच बाब लक्षात घेऊन घुमावलच्या ग्रामस्थांनी तीन वर्षांपूर्वी एकत्र येत वृक्षारोपणाची चळवळ सुरू केली. या चळवळीत हळूहळू ग्रामस्थांचा सहभाग वाढल्याने तिला व्यापक स्वरूप येऊ लागले आहे. ग्रामस्थांच्या एकीचे अन परिश्रमाचे फलित म्हणून, आजपर्यंत घुमावल गावाच्या आजूबाजूच्या क्षेत्रात गेल्या तीन वर्षांत सुमारे अडीच ते तीन हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही झाडे चांगली वाढली आहेत. या झाडांच्या तिसऱ्या वाढदिवसाचा कार्यक्रम नुकताच जल्लोषात साजरा करण्यात आला. घुमावल ग्रामस्थांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली. घुमावलच्या आदर्शवत उपक्रमाचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. यावेळी डॉ. पाटील यांच्या हस्ते संत गाडगेबाबा महिला व बाल ग्रामोद्यानाचा लोकार्पण सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने लोकसहभागातून हे उद्यान विकसित केले आहे. त्यात मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा अशी सुविधा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, युवकांसाठी ओपन जिम या संकल्पनेवर आधारित व्यायामाची साधने आहेत.