जळगाव - परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेत.
देशातील काही राज्यांबरोबरच महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातही बर्ड फ्लूमुळे पक्षी दगावले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जमादार, यांचेसह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तर तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिका व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.
जळगावात बर्ड फ्लूचा शिरकाव होऊ नये, यंत्रणानी दक्ष रहावे- जिल्हाधिकारी - जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव होणार नाही याची दक्षता
जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेत.
जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका नाही-
जळगाव जिल्ह्यात सध्या अंदाजे 226 पोल्ट्री फार्म आहेत. या व्यावसायिकांशी पशुसंवर्धन विभागाने समन्वय साधून त्यांना आवश्यक त्या सुचना व मार्गदर्शन करावे. जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी पशुसंवर्धन विभाग आवश्यक ती दक्षता घेत असून यासाठी पथकांची निर्मिती करण्यात आल्याचे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्ध शाम पाटील यांनी सांगितले. तसेच बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून तूर्त जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका नसल्याचे ए. डी. पाटील यांनी सांगितले.