जळगाव - देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाची बातमी ऐकून मला मोठा धक्काच बसला. ते भाजपचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी अडचणीच्या काळात भाजपला खंबीर साथ दिली होती. त्यांच्या निधनाने भाजपची अपरिमित हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
अरुण जेटलींच्या निधनाने भाजपची अपरिमित हानी - एकनाथ खडसे - कधीही भरून न निघणारे नुकसान
अरुण जेटलींच्या निधनावर माजी मंत्री एकनाथ खडसे म्हणाले की, जेटली हे भाजपचे ज्येष्ठ नेते तर होतेच शिवाय ते ज्येष्ठ समाजसेवकही होते. भाजपच्या थिंक टँकचे ते सक्रिय सदस्य होते. ते अर्थतज्ज्ञ तर होतेच तसेच ते विधिज्ञ देखील होते. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी अनेक प्रकरणात योग्यरित्या बाजू मांडत सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला होता.
![अरुण जेटलींच्या निधनाने भाजपची अपरिमित हानी - एकनाथ खडसे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4230300-thumbnail-3x2-jalgaon.jpg)
ते पुढे म्हणाले की, अरुण जेटली हे भाजपचे ज्येष्ठ नेते तर होतेच शिवाय ते ज्येष्ठ समाजसेवकही होते. भाजपच्या थिंक टँकचे ते सक्रिय सदस्य होते. ते अर्थतज्ज्ञ तर होतेच तसेच ते विधिज्ञ देखील होते. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी अनेक प्रकरणात योग्यरित्या बाजू मांडत सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला होता. मात्र, आज ते आपल्यातून निघून गेले आहेत.
काही दिवसांपूर्वी सुषमा स्वराज यांचे निधन झाले. त्यानंतर आज अरुण जेटली यांचे निधन झाले. भाजपचे दोन दिग्गज नेते एकापाठोपाठ एक असे काळाच्या पडद्याआड गेले. यामुळे भाजपचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रिया खडसेंनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.