महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीएचआर घोटाळा: संशयितांच्या जामीन अर्जांवर उद्या पुणे कोर्टात सुनावणी

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑप. सोसायटीचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे.

बीएचआर घोटाळा
बीएचआर घोटाळा

By

Published : Jan 4, 2021, 8:13 PM IST

जळगाव - भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑप. सोसायटीचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबर रोजी जळगावात छापेमारी करुन दोन ट्रक कागदपत्रे, संगणक जप्त करुन नेले आहेत. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले सीए महावीर जैन, विवेक ठाकरे, धरम साखला, सुजित बाविस्कर (वाणी) व कमलाकर कोळी यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

गेल्या महिन्यातील २२ डिसेंबर रोजी या अर्जांवर सुनावणी होणार होती. परंतू, सरकारी वकील अ‌ॅड. प्रवीण चव्हाण यांनी खुलासा सादर करण्यासाठी वेळ मागून घेतली होती. त्यामुळे आता ५ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. पुणे विषेश न्यायालयाचे न्यायाधिश एस.एस. गोसावी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

सर्व संशयित येरवडा कारागृहात-

सुजीत बाविस्कर, धरम सांखला, महावीर जैन, विवेक ठाकरे व कमलाकर कोळी हे सर्व संशयित सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन बंदी आहेत. गुन्ह्यात संशयित असलेल्या कुणाल शहा याचा अटकपूर्व जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

हेही वाचा-संभाजी महाराजांचे नाव पुणे जिल्ह्याला द्यावे - प्रकाश आंबेडकर

ABOUT THE AUTHOR

...view details