जळगाव -राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार असल्याच्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत. ते केंद्रात जाणार असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. या गोष्टीचे मी स्वागत करेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे. एकनाथ खडसे आज (शुक्रवारी) सकाळी जळगावात त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खडसेंनी फोन टॅपिंग, फडणवीस यांची केंद्रात जाण्याची चर्चा, मुंबईतील महानंदच्या कारभारसंदर्भात मत मांडले.
खडसे पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार असल्याच्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत. ते खरंच केंद्रात जाणार असतील तर मी या गोष्टीचे स्वागत करेल. ते अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा केंद्राला तर फायदा होईलच शिवाय राज्यालाही केंद्राच्या अनेक योजना पदरी पाडून घेण्यास मदत होईल. आपला एखादा जवळचा नेता केंद्रात जात असेल तर त्याचा आपल्यालाच फायदा होतो, असे खडसे यावेळी म्हणाले. खडसेंनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून फडणवीस आणि खडसेंमधील दुरावा खरंच कमी झाला आहे की नाही, याची चर्चा मात्र सुरू झाली आहे.
हेही वाचा -'राज्यकर्ते अजून किती निर्भयांचे बळी जाण्याची वाट पाहणार आहेत'
फोन टॅपिंग दुर्दैवीच -