जळगाव -जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील लोणी येथे अतिक्रमण निर्मूलन कारवाई वेळी पोलीस निरीक्षकासह पोलीस नाईक कर्मचाऱ्यास ग्रामस्थांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. आज, गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व त्यांचे सहकारी पोलीस नाईक कर्मचारी दिनेश मारवडकर यांना ही मारहाण झाली आहे.
- अतिक्रमण निर्मूलन कारवाई वेळी घडली घटना-
जामनेर तालुक्यातील लोणी या गावात जिल्हा परिषदेच्यावतीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारण्यात आले आहे. या आरोग्य उपकेंद्राच्या आवारात गावातील काही ग्रामस्थांनी अतिक्रमण करून बांधकाम केले होते. या अतिक्रमण संदर्भात स्थानिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाने जामनेर व जळगाव न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यात ग्रामपंचायत प्रशासनाच्या बाजूने निकाल लागला. म्हणून आज पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होती. तेव्हा वाद वाढल्याने ही हाणामारीची घटना घडली.
- अतिक्रमण करणाऱ्यांनी पोलिसांशी घातला वाद-