जळगाव - राज्यभरात केळी फळासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या उन्हामुळे फटका बसत ( ( Banana Farming Affected ) ) आहे. एकीकडे जळगाव जिल्ह्याचा उन्हाचा पारा हा 45 अंशाच्या पार गेल्याने केळी बागायतदार शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेक बागांमधील केळीचे खोड करपायला लागली असून त्यांची वाढ ही थांबली आहे. तर दुसरीकडे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून योग्य पद्धतीने पाणी देणे ही शेतकऱ्यांना शक्य होत नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येऊन ठेपले आहे.
वाढत्या उन्हाच्या पाण्यामुळेच केळी बागांना मोठा फटका -जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जळगावातील केळी ही इतर राज्यांमध्येही जात असते. मात्र ,जळगावचा उन्हाचा पारा हा 45 अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने केळीचे मोठे नुकसान होत आहे. मार्च महिन्यापासूनच जळगावचा पारा हा उच्चांकी गाठत असून शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. यामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी बागांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
केळी झाडांची पाने लागली करपायला -सततच्या वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली केळीची बागांची लागवडीच्या झाडांची वाढ थांबली असून वाढलेले झाडांवरील पाणी वाढत्या उन्हामुळे करायला सुरुवात झाली आहे. यामुळे झाडांची वाढ होत नसून याला केळीचे फळही येत नाही. तसेच उभे असलेले घडही खाली पडतानाचे चित्र दिसून येत आहे.