महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शुद्ध हवा देणाऱ्या इलेक्ट्रिक मास्कची निर्मिती; जळगावातील खगोल अभ्यासकाचा दावा - जळगावातील खगोल अभ्यासक

हे उपकरण १२ व्होल्ट वीजेवर चालते. सर्जिकल मास्कमध्ये श्वास घेण्यास व सोडण्यास काहींना त्रास होत असतो. मात्र, या यंत्रात सहज श्वास घेता व सोडता येतो. त्यामुळे थकवा जाणवत नाही. गरजेनुसार हे उपकरण लहान व मोठे करता येते आणि १२ व्होल्ट्सवर या यंत्राचे काम चालते.

bacteria and virus free electric mask made by jalgaon astrophysicist
शुद्ध हवा देणाऱ्या इलेक्ट्रिक मास्कची निर्मिती; जळगावातील खगोल अभ्यासकाचा दावा

By

Published : Mar 29, 2020, 5:37 PM IST

जळगाव- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सुरक्षिततेच्या उपाययोजना शासन, प्रशासन आणि नागरिकांकडून वापरण्यात येत आहेत. पारंपरिक मास्क वापरादरम्यान असणारे धोके टाळण्यासाठी जळगावातील खगोल अभ्यासक सतीश पाटील यांनी विषाणुमुक्त आणि शुद्ध हवा तयार करणाऱ्या मास्कची निर्मिती केली आहे.

शुद्ध हवा देणाऱ्या इलेक्ट्रिक मास्कची निर्मिती; जळगावातील खगोल अभ्यासकाचा दावा

सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. या व्हायरसचा हवेतून संसर्ग होत नसला, तरी स्पर्शातून होतो. त्या अनुषंगाने जळगाव येथील खगोल अभ्यासक सतीश पाटील यांनी विषाणूमुक्त व हवा शुद्ध करणारे उपकरण शोधले आहे. हे उपकरण १२ व्होल्ट वीजेवर चालते. सर्जिकल मास्कमध्ये श्वास घेण्यास व सोडण्यास काहींना त्रास होत असतो. मात्र, या यंत्रात सहज श्वास घेता व सोडता येतो. त्यामुळे थकवा जाणवत नाही. गरजेनुसार हे उपकरण लहान व मोठे करता येते आणि १२ व्होल्ट्सवर या यंत्राचे काम चालते.

असे चालेल काम -

या उपकरणाची काम करण्याची पद्धती अनोखी आहे. या उपकरणात हवा वेगाने आत जाते. याठिकाणी असलेल्या डब्यात सर्जिकल कॉटन, टिश्यू पेपर आहे. त्यावर अल्कोहोल टाकलेले आहे. पंख्याने आत आलेली हवा वेगाने अल्कोहोलने भिजलेल्या कापूस व कागदावर आदळली जाते. त्यामुळे हवेतील विषाणू, सूक्ष्म जीवाणू हे अल्कोहोलच्या सानिध्यात आल्याने नष्ट होतात.

या उपकरणाचा वापर कुठे? -

रुग्णालये, गर्दीच्या ठिकाणी, कार्यालयात, ऑपरेशन थिएटर याठिकाणी हे उपकरण वापरता येणार आहे. यात एका बाजूने हवा येते आणि दुसऱ्या बाजूने हवा शुद्ध होत असते. या उपकरणाला मास्कदेखील जोडता येतो. सध्या कोरोना व्हायरसचा प्रसार वेगात होत आहे. कोरोना रुग्णांच्या सान्निध्यात असलेल्या डॉक्टरांसाठी हे उपकरण चांगल्याप्रकारे उपयुक्त ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details