महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्हा उपकारागृहातच कैद्यावर प्राणघातक हल्ला; जुन्या वादातून तिघा कैद्यांकडून पत्र्याने वार - Jalgaon District jail

जिल्हा उपकारागृहात एका कैद्यावर जुन्या वादातून तीन कैद्यांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सदर कैदी गंभीर जखमी झाला असून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

जळगाव जिल्हा उपकारागृहातच कैद्यावर प्राणघातक हल्ला
जळगाव जिल्हा उपकारागृहातच कैद्यावर प्राणघातक हल्ला

By

Published : Jan 15, 2020, 10:29 PM IST

जळगाव - जिल्हा उपकारागृहात एका कैद्यावर जुन्या वादातून तीन कैद्यांनी प्राणघातक हल्ला केला. ही घटना आज (बुधवारी) सकाळच्या सुमारास घडली. शुभम देशमुख उर्फ दाऊद (वय २०, रा. अमळनेर) असे या घटनेत जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

शुभम देशमुख हा प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात उपकारागृहात बंदी आहे. आज सकाळी त्याच्यावर राकेश वसंत चव्हाण, त्याचा भाऊ राजू वसंत चव्हाण (दोघे रा. अमळनेर) आणि राहुल पंढरीनाथ पाटील यांनी जुन्या वादातून प्राणघातक हल्ला केला. या घटनेत शुभमवर पत्र्याने वार केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर हल्ला करणारे तिघे देखील बंदी म्हणून उपकारागृहात आहेत.

सकाळी साडेसात वाजता शुभम हा कारागृहाच्या आतील आवारात उभा होता. यावेळी राकेश, राजू तसेच राहुल हे त्याच्याजवळ आले. यांनी त्याच्याशी जुन्या विषयावरून वाद घालण्यास सुरुवात केली. शाब्दिक चकमकीनंतर त्यांच्यातील एकाने शुभमच्या चेहऱ्यावर हातातील धारदार पत्र्याने वार केला. कारागृहाच्या आवारात कैद्यावर हल्ला झाल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. हल्ला करणाऱ्या तिघांना शुभमजवळून दूर करण्यात आले. त्यानंतर जखमी शुभमला त्वरित जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

हेही वाचा - जळगाव महापालिकेच्या १५ कोटी रुपयांच्या विकासकामांना ब्रेक, सरकारने निधीला नाकारली मुदतवाढ

जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी रुग्णालयात येवून जखमी कैद्याचा जबाब नोंदवून घेतला. जुन्या वादाच्या कारणावरून शुभमवर हल्ला केल्याप्रकरणी राकेश वसंत चव्हाण, त्याचा भाऊ राजू वसंत चव्हाण व राहुल पंढरीनाथ पाटील या तिघा कैद्यांविरूध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - जामठीत टाटा इंडिकॅशचे एटीएम फोडले; चोऱ्यांचे सत्र वाढले, पोलिसांसमोर आव्हान

ABOUT THE AUTHOR

...view details