महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुक्ताईनगर पंचायत समितीच्या माजी सभापतींची हत्या; मध्यरात्रीची घटना, कारण अस्पष्ट - dinkar patil murder case Jalgaon

दिनकर पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असताना मुक्ताईनगर पंचायत समितीचे सभापती होते. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपत दाखल झालेले होते. मंगळवारी मध्यरात्रीनंतर दोन ते अडीच वाजेदरम्यान त्यांची अज्ञात व्यक्तींनी हत्या केली आहे.

dinkar patil
दिनकर पाटील

By

Published : Jun 17, 2020, 11:13 AM IST

Updated : Jun 17, 2020, 11:28 AM IST

जळगाव -जिल्ह्यातील मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर ओंकार पाटील यांची अज्ञात व्यक्तींनी हत्या केल्याची धक्कादायक घटना आज (बुधवारी) सकाळच्या सुमारास उघडकीस आलीये. मंगळवारी मध्यरात्रीनंतर कुऱ्हा-काकोडा रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपांच्या आवारातच ही घटना घडली आहे. दिनकर पाटील यांच्या हत्येचे कारण अस्पष्ट आहे. घटनास्थळी मुक्ताईनगर पोलीस दाखल झाले असून, पंचनाम्याचे काम सुरू आहे.

दिनकर पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असताना मुक्ताईनगर पंचायत समितीचे सभापती होते. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपत दाखल झालेले होते. मंगळवारी मध्यरात्रीनंतर दोन ते अडीच वाजताच्या सुमारास त्यांची अज्ञात व्यक्तींनी हत्या केली आहे. ही घटना कुऱ्हा गावाजवळ कुऱ्हा-काकोडा रस्त्यावर असलेल्या इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपाच्या आवारातच घडली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेचे वृत्त वाऱ्याच्या वेगाने मुक्ताईनगर तालुक्यात पोहचले. त्यामुळे घटनास्थळी मोठा जमाव जमला होता.

या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, दिनकर पाटील यांच्या हत्येचे कारण अस्पष्ट आहे. पोलिसांनी घटनास्थळी काही पुरावे मिळतात का? यासाठी काहींचे जबाब देखील नोंदवले. त्याचप्रमाणे पेट्रोल पंपाच्या आवारातील सीसीटीव्हीचे फुटेज मिळवण्याचेही पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय -

दिनकर पाटील हे राजकारणात सक्रिय होते. त्यांची हत्या राजकीय पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. दिनकर पाटील यांचे राजकीय वैर होते का? याआधी त्यांचा कुणाशी वाद होता का? या बाजूनेही चाचपणी पोलीस करत आहेत. राजकीय पूर्ववैमनस्य तसेच अन्य बाजूनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.

Last Updated : Jun 17, 2020, 11:28 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details