महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वाॅर्डबाॅयला आशा वर्करने चपलेने बदडले - आशा वर्कर जळगाव

वाईट विचाराने अनोळखी महिलांना घरी आणण्यासाठी घराच्या चावीची मागणी करणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वाॅर्डबाॅयची आशा वर्करने चपलेने धुलाई केल्याची घटना सिव्हिल रुग्णालयात पाेलिसांच्या उपस्थितीत घडली.

Asha Worker slapped the warden
जळगाव

By

Published : Oct 23, 2020, 4:05 PM IST

Updated : Oct 23, 2020, 4:35 PM IST

जळगाव -वाईट विचाराने महिलांना दुपारच्या वेळी घरी आणण्यासाठी घराच्या चावीची मागणी करणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वाॅर्डबाॅयची आशा वर्करने चपलेने धुलाई केल्याची घटना सिव्हिल रुग्णालयात पाेलिसांच्या उपस्थितीत घडली. याप्रकरणी आशावर्कर यांनी वाॅर्डबाॅय किरण मधुकर दुसाने व स्वच्छता निरीक्षक बापू नारायण बागलाने या दाेघांची कसून चाैकशी करण्याबाबतची तक्रार अधिष्ठाता कार्यालयाकडे दिली आहे.

पीडित महिला माहिती देताना

ममुराबाद येथील आशावर्कर व शबरीमाता भिल्ल समाज संस्थेची जिल्हाध्यक्ष या संस्थेच्या कार्यकर्त्यांसह सिव्हिलच्या प्रवेशद्वाराजवळ थांबून हाेत्या. वाॅर्डबाॅय किरण दुसाने हे १४ नंबर आयसीयूमधून ड्यूटी संपवून घरी जात असताना त्यांना अडवून आशावर्कर यांनी मारहाण केली. या वेळी गेटवर ड्यूटीवर असलेल्या पाेलीस व सुरक्षा रक्षकांनी किरण दुसाने यांची महिलांच्या तावडीतून सुटका केली. अधिष्ठाता यांना दिलेल्या तक्रारीत यांनी म्हटले की, किरण दुसाने व बापू नारायण बागलाने हे दाेघे एक महिन्यापासून साेबत अनाेळखी महिलांना घेऊन दुपारी जेवणानंतर तुमच्या घरी येऊ असे सांगतात. तुमच्या घराची चावी द्या, या मागणीसाठी दीड महिन्यात ८ ते १० वेळा फाेन केले. त्यावर नकार दिला असता दाेघांनी फाेनवर शिवीगाळ करून अश्लील भाषेत बाेलले. तसेच तीन वर्षांपासून ब्लडप्रेशर आजाराच्या गाेळ्या सुरू असून, हे दाेघे ४० रुपये घेऊन या गाेळ्या देतात. त्यांचे ऐकले नाही म्हणून फाेन करून शिवीगाळ केली व गाेळ्या देण्यासही नकार दिला. या दाेन्ही कर्मचाऱ्यांची चाैकशी करावी आणि न्याय द्यावा, अशी मागणी यांनी तक्रार अर्जात केली आहे.

कर्मचारी दिसताच दिला चपलेने चोप -
कर्मचाऱ्यांच्या या त्रासाला कंटाळून काही महिलांसोबत पीडित महिला ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या आवारात आली होती. दुपारी एक वाजेच्या सुमारास कर्मचारी मनोज दुसाने हा मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिसताच महिलेने त्यास जाब विचारत चपलेने चोप दिला. त्यानंतर दुसाने याने महिलेचं माफी मागितली. दाेन कर्मचाऱ्यांबाबत तक्रार प्राप्त झाली. कर्मचाऱ्यांना नाेटीस बजावून खुलासा मागवण्यात येईल. खुलासा याेग्य नाही वाटला तर चाैकशी समिती नेमण्यात येईल. मारहाणीबद्दल कर्मचाऱ्याने तक्रार केली नाही. असे प्रभारी अधिष्ठाता डाॅ. मारुती पाेटे यांनी सांगितले.

Last Updated : Oct 23, 2020, 4:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details