महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

St Worker Strike Issue : माझ्याप्रमाणे इतरांचे कुंकू पुसले जाऊ नये - ऐश्‍वर्या चौधरी - Appeal of suicidal ST employee wife

गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्माचाऱ्यांचे आंदोलन सुरु ( Maharashtra St Worker Strike ) आहे. या कर्मचाऱ्यांनी खचून न जाता टोकाचा निर्णय घेऊ नये, अशी भावनिक साद ऐश्‍वर्या चौधरी यांनी घातली आहे.

ऐश्‍वर्या चौधरी व परिवार
ऐश्‍वर्या चौधरी व परिवार

By

Published : Jan 16, 2022, 6:45 PM IST

Updated : Jan 17, 2022, 2:48 PM IST

जळगाव - एसटी कर्मचाऱ्यांची ( Maharashtra St Worker Strike ) जी लढाई सुरु आहे, त्यात ते जिंकतील. मात्र, त्यांनी खचून न जाता कर्माचाऱ्यांनी टोकाचा निर्णय घेऊ नये. जसे माझे कुंकू पुसले, तसे इतरांचे कुंकू पुसले जाऊ नये, अशी भावनिक साद आत्महत्याग्रस्त एसटी कामगार मनोज चौधरी यांच्या पत्नी ऐश्‍वर्या चौधरी यांनी राज्यातील एसटी कर्माचाऱ्यांना घातली आहे.

आत्महत्याग्रस्त मनोज चौधरीच्या कुटुंबाची व्यथा

राज्यात आतापर्यंत 46 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील कुसूंबा येथील एसटी वाहन चालक मनोज अनिल चौधरी यांनी कमी पगार व त्यातील अनियमितता यासाठी ठाकरे सरकारला जबाबदार ठरवत आत्महत्या केली. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय उघडल्यावर पडले आहे. त्यांच्या पत्नी, वडील तसेच भाऊ यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून एसटी महामंडळ राज्य शासनात विलगीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे आदोंलन सुरु आहे. त्या पार्श्वभुमीवर मनोज चौधरी यांच्या पत्नी ऐश्‍वर्या चौधरी म्हणाल्या की, "एसटी कर्माचाऱ्यांची जी लढाई सुरु आहे, ते जिंकतील. मात्र, खचून जावून कोणीही कर्माचाऱ्यांनी कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नये. माझे कुंकू पुसले, तसे इतरांचे कुंकू पुसले जाऊ नये. त्यामुळे शासनाने मागण्या मान्य कराव्यात" अशीही मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

मनोज हा मोठा मुलगा होता. तो घरचा कर्ता पुरुष होता. अनेक स्वप्न बघितली होती. पण, त्याच्या जाण्याने स्वप्नांचा चुराडा झाला आहे. मला उदरनिर्वाहात हात लावण्याबरोबरच सर्व कुटुंबांची जबाबदारी त्याच्यावर होती. तो गेल्यानंतर कुटुंब विस्कळीत झाले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा शासनाने विचार करुन लवलवकरात लवकर त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा. जेणेकरुन माझ्या मुलाप्रमाणे इतर कुणालाही आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, अशी प्रतिक्रिया मनोज चौधरी यांचे वडील अनिल चौधरी यांनी दिली आहे.

हेही वाचा -Statue of Shivaji Maharaj Removed : अमरावतीत पुतळ्यांचे राजकारण; शहरासह दर्यापूरमध्ये तणाव

Last Updated : Jan 17, 2022, 2:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details