महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jalgaon Accident : जामनेर-पहूर रस्त्यावर पुन्हा अपघात; दोन ठार,तीन जखमी - टाटा इंडिगो गाडीला अपघात जळगाव

जामनेर-पहुर रस्त्यावरील नागदेवता मंदीराजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत टाटा इंडीगो गाडीतील एक पुरुष व एक महिला जागीच ठार झाले तर ३ महिला गंभीर जखमी (Jalgaon Accident) झाल्या.

Jalgaon Accident
Jalgaon Accident

By

Published : Dec 23, 2021, 2:29 PM IST

जळगाव -जामनेर-पहुर रस्त्यावरील नागदेवता मंदीराजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत टाटा इंडीगो गाडीतील एक पुरुष व एक महिला जागीच ठार झाले तर ३ महिला गंभीर जखमी (Jalgaon Accident) झाल्या. अपघातात एक ६ महिन्यांचे बाळ मात्र सुरक्षित आहे. या आधीही जामनेर तालुक्यात अशाच पध्दतीने भीषण अपघात झाला होता.

जामनेर-पहूर रस्त्यावर पुन्हा अपघात


भुसावळ येथील रहिवाशी कुटुंब लग्नकार्या निमित्त टाटा इंडिगो गाडीने औरंगाबादकडे जात होते. जामनेर शहराजवळील नागदेवता मंदीराजवळ सकाळी ९ वाजे दरम्यान त्यांच्या इंडीगो गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात पंकज गोविंद सैंदाणे आणी सुजाता प्रविण हिवरे हे जागीच ठार झाले. तर गाडीतील हर्षा पंकज सैंदाणे आणी नेहा राजेश अग्रवाल या गंभीर जखमी झाल्या. दोघांवर जामनेर शहरातील ग्लोबल महाराष्ट्र रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताl गंभीर जखमी झालेल्या प्रतिभा जगदिश सैंदाणे यांना पुढील उपचारांसाठी जळगांव येथे हलविण्यात आले. या अपघातात स्पंदन पंकज सैदाने हे ६ महिन्यांचे बाळ सुरक्षित आहे.

गिरीश महाजन यांनी केली पाहणी

टाटा इंडीगो गाडीला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा जामनेर पोलीस तपास करत आहेत. गेल्या दोन दिवस आधी जामनेर तालुक्यात अशाच पद्धतीने भीषण अपघात झाला होता. यात चार जणांचा मृत्यूही झाला होता.याबाबत स्वतः माजी मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.तर राज्य शासनाविरोधात जोरदार प्रतिक्रियाही दिलि होती.

हेही वाचा -सांगली : जत जवळ एकाच ठिकाणी दोन भीषण अपघात; 3 जण ठार

ABOUT THE AUTHOR

...view details