जळगाव - शहरातील संत तुलसी विद्याप्रसारक मंडळ संचालित सरस्वती विद्यामंदिर व माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या स्नेह संमेलनातून विद्यार्थ्यांना मुक्या प्राण्यांविषयी भूतदयेचे धडे देण्यात आले. सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. पक्षांना पाण्याची सोय व्हावी, म्हणून विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या आवारातील झाडांवर पाण्याची भांडी लावली आहेत.
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा. तसेच त्यांच्यावर चांगले संस्कार रुजावेत, या उद्देशाने सरस्वती विद्यालयातर्फे दरवर्षी स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची संकल्पना जरा वेगळी होती. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांची वाहवा मिळवली.
स्वराज्यभिषेकाचा प्रसंग केला सादर -
स्नेहसंमेलनात काही विद्यार्थ्यांनी स्वराज्यभिषेकाचा प्रसंग सादर केला. विद्यार्थ्यांच्या अप्रतिम सादरीकरणाने प्रत्यक्ष शिवशाही अवतरल्याची प्रचिती आली.