जळगाव -जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल गठीत करण्यासंदर्भात आज (सोमवारी) सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. ही बैठक दुपारी 4 वाजेनंतर अजिंठा शासकीय विश्रामगृहात होण्याची शक्यता आहे. या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होऊन निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री गुलाबराव देवकर यांची बैठकीला उपस्थिती असणार आहे. बऱ्याच दिवसांनी ही नेतेमंडळी एकत्र बैठकीला हजर राहणार आहे, ते खरंच हजर राहतील का? याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक; खडसे-महाजनांच्या उपस्थितीबाबत उत्सुकता - ncp shivsnea and bjp
2019 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबत युतीचे आश्वासन दिले होते. पण ऐनवेळी स्वतंत्र पॅनल रिंगणात उतरवले होते. याचीच भीती आताही शिवसेनेसह राष्ट्रवादीला आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांची मनधरणी करण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यशस्वी होतात का? हे देखील आजच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.
शिवसेना-राष्ट्रवादीचे ठरले, भाजपचे तळ्यातमळ्यात!
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्र लढण्यावर एकमत झाले आहे. मात्र, भाजपच्या भूमिकेबाबत साशंकता आहे. 2019 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबत युतीचे आश्वासन दिले होते. पण ऐनवेळी स्वतंत्र पॅनल रिंगणात उतरवले होते. याचीच भीती आताही शिवसेनेसह राष्ट्रवादीला आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांची मनधरणी करण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यशस्वी होतात का? हे देखील आजच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.