महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावातील सराफ व्यावसायिकाची सामाजिक बांधिलकी; 300 परप्रांतीय कुटुंबांना दिला महिनाभराचा किराणा - jalgaon news

जळगावातील सुवर्ण बाजार हा देशभरात प्रसिद्ध आहे. याठिकाणी बंगाल प्रांतातील शेकडो सुवर्ण कारागीर कुटुंब उदरनिर्वाहासाठी स्थायिक झालेले आहेत. मात्र, अलीकडच्या काळात कोरोनामुळे सुवर्ण बाजारातील उलाढाल ठप्प असल्याने त्यांच्या हाताला काम उरलेले नाही. बंगाली कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

jalgaon
जळगावातील सराफ व्यावसायिकाची सामाजिक बांधिलकी; 300 परप्रांतीय कुटुंबांना दिला महिनाभराचा किराणा

By

Published : Apr 27, 2020, 3:05 PM IST

जळगाव - शहरातील महावीर ज्वेलर्सचे संचालक अजय ललवाणी यांनी कोरोनामुळे संकटात सापडलेल्या सुमारे 300 परप्रांतीय कुटुंबांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. 'समाजाचे आपण काही देणं लागतो', या भावनेतून ललवाणी यांनी उदरनिर्वाहासाठी जळगावात आलेल्या बंगाली सुवर्ण कारागिरांना एका महिन्याचा किराणा दिला आहे. ललवाणी यांनी आपल्या कृतीतून समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे.

जळगावातील सराफ व्यावसायिकाची सामाजिक बांधिलकी; 300 परप्रांतीय कुटुंबांना दिला महिनाभराचा किराणा

कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने फैलावत असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने 3 मेपर्यंत लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही ठप्प आहे. जळगावातील सुवर्ण बाजार हा देशभरात प्रसिद्ध आहे. याठिकाणी बंगाल प्रांतातील शेकडो सुवर्ण कारागीर कुटुंब उदरनिर्वाहासाठी स्थायिक झालेले आहेत. मात्र, अलीकडच्या काळात कोरोनामुळे सुवर्ण बाजारातील उलाढाल ठप्प असल्याने त्यांच्या हाताला काम उरलेले नाही. बंगाली कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष तथा महावीर ज्वेलर्सचे संचालक अजय ललवाणी यांनी स्वतःहून पुढाकार घेत त्यांच्याकडे कामाला असलेल्या बंगाली सुवर्ण कारागिरांसोबतच इतरांना देखील मदतीचा हात दिला. प्रत्येक कारागिराच्या कुटुंबीयांसाठी एका महिन्याचा किराणा उपलब्ध करून दिला. चहा-साखर, तेल, मीठ, विविध प्रकारच्या डाळी, साबण, गहू, तांदूळ अशा वस्तुंचा समावेश असलेली पाकिटे सुवर्ण कारागिरांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून वाटण्यात आले.

अडचणीच्या काळात अजय ललवाणी यांनी मदत केल्याने बंगाली सुवर्ण कारागिरांवरील उपासमारीचे संकट टळले आहे. ललवाणी यांनी केलेली मदत आम्ही आयुष्यभर विसरणार नाही, अशा भावना यावेळी काही कारागिरांनी व्यक्त केल्या. दरम्यान, लॉक डाऊनच्या काळात सुवर्ण कारागिरांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना शक्य ती मदत करेल, असेही अजय ललवाणी यांनी सांगितले. या उपक्रमासाठी ललवाणी यांना जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह जळगावातील इतर सराफ व्यावसायिकांचे सहकार्य लाभले.

ABOUT THE AUTHOR

...view details