जळगाव - कृषी विभागाची अनेक कामे ऑनलाइन करावी लागत आहेत. मात्र, बहुतेक कृषी सहाय्यकांकडे चांगला अँड्रॉइड मोबाइल नसल्याने काम करण्यात अडचणी येत आहेत. या कारणास्तव कृषी सहाय्यकांनी क्रॉपसॅपच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. या विषयाबाबत राज्य कृषी सहाय्यक संघटना आक्रमक झाली आहे. अँड्रॉइड मोबाइल अभावी येणाऱ्या अडचणी सोडवण्याची संघटनेची मागणी आहे.
कृषी सहाय्यक ऑनलाइन अॅपव्दारे अनेक प्रकारचेकाम करीत आहेत. बहुतेक कृषी सहाय्यकांकडे नव्या व्हर्जनचा मोबाइल नसल्याने सपोर्ट करीत नाही. संघटनेकडून वारंवार लॅपटॉप, टॅबची मागणी करूनही ती पूर्ण झालेली नाही. कृषी सहाय्यकांना इतर योजनांच्या अंमलबजावणीमुळे व अतिरिक्त पदभारामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत प्रकल्प व मिनी किटच्या जियो टॅगिंगचे काम करणे अशक्य होत आहे.