महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिंताजनक.. जळगाव जिल्ह्यात साडेतीन महिन्यानंतर आढळले द्विशतकी कोरोनाबाधित - Corona Patient Discharge Jalgaon

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आता वेगाने वाढत आहे. आज जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येने द्विशतकी आकडा ओलांडला. जिल्ह्यात तब्बल साडेतीन महिन्यानंतर द्विशतकी कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

Jalgaon
जळगाव

By

Published : Feb 21, 2021, 8:35 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आता वेगाने वाढत आहे. आज जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येने द्विशतकी आकडा ओलांडला. जिल्ह्यात तब्बल साडेतीन महिन्यानंतर द्विशतकी कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे, जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील एक हजारांच्या पार गेल्याने आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

हेही वाचा -जळगाव : दालमिल व्यापाऱ्याची 19 लाखांत फसवणूक; सुरतच्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

जिल्हा प्रशासनाकडून आज सायंकाळी प्राप्त झालेल्या आकडेवारीत जिल्ह्यात 216 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. आज दिवसभरात 28 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 58 हजार 535 इतका झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे, त्यातील 56 हजार 96 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 371 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज देखील एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.

जळगाव शहर बनले हॉटस्पॉट

सद्यस्थितीत जिल्ह्यात जळगाव शहर कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. शहरात दररोज मोठ्या दोन आकडी संख्येने कोरोनाबाधित रुग्ण समोर येत आहेत. आज देखील एकट्या जळगाव शहरात 79 कोरोनाबाधित आढळले. जळगाव शहरापाठोपाठ भुसावळात 24, अमळनेरात 16, चोपड्यात 17, तर चाळीसगाव शहरात 54 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. एकंदरीतच जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कोरोना आपले हातपाय पसरत असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 66 इतकी असून, त्यात 326 रुग्ण हे लक्षणे असलेले, तर 740 रुग्ण लक्षणे नसलेले आहेत.

अशी आहे आकडेवारी

जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 58535

जिल्ह्यातील एकूण बरे झालेले रुग्ण - 56096

सद्यस्थितीतील अॅक्टिव्ह रुग्ण - 1066

जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 1371

डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये असलेले रुग्ण - 206

डेडिकेटेड कोविड रुग्णालयामध्ये असलेले रुग्ण - 120

होम आयसोलेशनमध्ये असलेले रुग्ण - 730

क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेले रुग्ण - 74

ऑक्सिजनवर असलेले रुग्ण - 73

आयसीयूत असलेले रुग्ण - 49

हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष : 'पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी' योजना ठरत आहे दिवास्वप्न

ABOUT THE AUTHOR

...view details