महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा धसका; जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी 25 कोरोना संशयित दाखल

बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 96 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 25 रुग्ण कोरोना संशयित म्हणून दाखल करण्यात आले. स्क्रिनिंग ओपीडीमध्ये आजअखेर 4 हजार 558 रुग्णांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे.

Corona
जिल्हा रुग्णालय

By

Published : Apr 22, 2020, 7:28 PM IST

जळगाव- येथील जिल्हा रुग्णालयात बुधवारी दिवसभरात तब्बल 25 कोरोना संशयित रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांना कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आली आहेत. त्यांचे स्वॅब घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.

जिल्हा रुग्णालयातील स्क्रिनिंग ओपीडीमध्ये बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 96 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 25 रुग्ण कोरोना संशयित म्हणून दाखल करण्यात आले. स्क्रिनिंग ओपीडीमध्ये आजअखेर 4 हजार 558 रुग्णांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे. त्यात आजपर्यंत 356 संशयित रुग्णांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 288 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह, 5 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह तसेच उर्वरित 61 अहवाल प्रलंबित आहेत.

दरम्यान, 21 एप्रिलला पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील 11 जणांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. 21 एप्रिलला जिल्हा रुग्णालयात 3 कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. मात्र, ते अद्याप प्राप्त झालेले नाहीत, असेही डॉ. भास्कर खैरे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details