जळगाव - जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवापासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची विक्री करण्यासाठी तहसील कार्यालयात २४ निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात येणार आहेत. प्रत्येकाकडे दोन गावांचे काम दिले जाणार आहे. त्यांच्या मार्फत उमेदवारी अर्जांची विक्री होणार आहे.
दरम्यान, तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींपैकी २३ गावांची माहिती संगणकीय फिडिंगचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित गावांची माहिती आज(सोमवारी) पूर्ण होणार आहे. या कामासाठी शंभरावर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मंगळवारी कार्यालयात बॅरिकेट लावून बुधवारपासून उमेदवारासोबत दोन व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग राखून निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली.
७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका-
जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला होणार आहेत. बुधवारपासून प्रत्येक तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, अर्ज घेतल्यानंतर आधी अर्ज ऑनलाइन भरून त्यांची प्रिंट काढावी लागणार आहे. ती प्रिंट अर्जासोबत जोडून कागदपत्रे तपासून अनामत भरल्यानंतर अर्ज स्वीकारला जाईल, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम