महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'भाजपकडे बंगालचे नेतृत्त्व करणारा चेहरा नसल्यानेच जनमत ममताच्या बाजूने' - गुलाबराव पाटील बंगाल निवडणूक निकाल प्रतिक्रिया

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू ही राज्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतमोजणी पार पडत आहे. सुरुवातीच्या कलांवरून बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने बाजी मारल्याचे चित्र आहे. यावर राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.

Gulabrao Patil on Bengal election result
गुलाबराव पाटील बंगाल निवडणूक निकाल प्रतिक्रिया

By

Published : May 2, 2021, 1:00 PM IST

जळगाव - भाजपकडे बंगालचे नेतृत्त्व करणारा चेहरा नव्हता म्हणूनच पश्चिम बंगालमधील जनमताचा कौल ममता बॅनर्जींच्या बाजूने आला, असे मत राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते आज (रविवारी) दुपारी जळगावात आलेले होते. अजिंठा शासकीय विश्रामगृहात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालावर त्यांनी आपले मत मांडले.

गुलाबराव पाटील बंगाल निवडणूक निकालांबाबत प्रतिक्रिया दिली

राज्यात कोण नेतृत्त्व करू शकतो, यावर जनतेचे शिक्कामोर्तब -

पश्चिम बंगालमधील जनतेने राज्यात कोण नेतृत्त्व करू शकतो, जनतेच्या कामांसाठी कोण पुढे येऊ शकतो, याचा विचार करूनच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे ममता दीदींचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपला थेट केंद्रातून सर्व प्रकारची रसद पुरवली गेली. मात्र, त्यांच्याकडे राज्याचे नेतृत्त्व करणारा चेहरा नसल्यानेच ममता दीदींच्या बाजूने जनमताचा कौल गेला. कोणत्याही राज्याचा नागरिक केंद्राच्या वेळी वेगळ्या पद्धतीने मतदान करतो आणि राज्याच्या वेळी तो वेगळ्या पद्धतीने करतो. ममता दीदींनी राज्याचे नेतृत्त्व करावे, हे पश्चिम बंगालमधील लोकांच्या मनात पक्के होते. हाती येत असलेल्या निकालांमधून हे सिद्ध होत आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

लोकांनी गद्दारीला चपराक दिली -

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून मोदींचा करिष्मा ओसरला का? यापेक्षा राज्याचा विकास कोण करू शकतो, मातीशी कोण जुळला आहे, याचा मतदारांनी केला. मोदींकडे जे लोक गेले होते, ते ममता दीदींचीच अपत्ये होती. त्यामुळे लोकांनी 'लाश वही है, बस कफन बदल गया है', अशा प्रकारची हुशारी दाखवली. लोकांनी भाजपच्या गद्दारीला चपराक दिली आहे, असेही पाटील म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details