महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात धावत्या ट्रकचे चाक निखळून दुचाकीवर आदळले, तरुण ठार - एनएच 6 वर जळगावमध्ये अपघात

जळगाव येथील साकेगावजळ अपघात झाला. ट्रकचे चाक निखळून समोरून येणाऱ्या दुचाकीवर आदळले. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. बादल गोकुळ पवार असे मृताचे नाव आहे.

Jalgaon
जळगाव

By

Published : May 23, 2021, 4:22 PM IST

जळगाव -रस्त्यावर धावणाऱ्या ट्रकचे चाक निखळून समोरून येणाऱ्या दुचाकीवर आदळले. या अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार झाला आहे. ही दुर्दैवी घटना आज (23 मे) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळ घडली. बादल गोकुळ पवार (रा. साकेगाव ता. भुसावळ, जि. जळगाव) असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

जळगावात धावत्या ट्रकचे चाक निखळून दुचाकीवर आदळले, तरुण ठार

नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय महामार्गावरील साकेगावजवळ भुसावळकडून जळगावच्या दिशेने (एमएच १५ एफव्ही ९९९४) सिमेंटचा टँकर असलेला एक ट्रक येत होता. या ट्रकचे मागचे एक चाक अचानक निखळले. हे चाक जळगावकडून भुसावळकडे दुचाकीवरून जाणाऱ्या बादलच्या दुचाकीवर समोरून जोरात आदळले. त्यात बादलची दुचाकी रस्त्याच्या कडेला फेकली गेली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला.

उपचारादरम्यान बादलचा मृत्यू

या अपघातानंतर जखमी बादलला काही लोकांनी तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना काही वेळाने त्याचे निधन झाले. बादलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा -ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारला पंजाब पोलिसांनी केली अटक; हत्येचा आहे आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details