जळगाव -जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. तसेच कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 12 हजारांच्या उंबरठ्यावर आहे. त्यात दीड हजारांवर रुग्ण हे ऑक्सिजन प्रणालीवर, तर 800 पेक्षा अधिक रुग्ण अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. एवढ्या रुग्णसंख्येसाठी दररोज जिल्ह्यात किमान 40 टन लिक्विड ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजन गॅस साठवणूक करण्यासाठीची क्षमता 50 टनांची आहे. मात्र, जिल्ह्यासाठी दररोज केवळ 30 ते 35 टन लिक्विड एवढाच ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. अशा परिस्थितीत 8 ते 10 टन लिक्विड एवढ्या ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णसंख्या अनियंत्रित राहिल्यास अनर्थ होण्याची भीती आहे.
कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता, जिल्ह्यासाठी दररोज दोन लिक्विड ऑक्सिजनचे टॅंकर मिळणे गरजेचे आहे. कृत्रिम ऑक्सिजनच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मुंबई व रायगड जिल्ह्यातील लिक्विड ऑक्सिजन उत्पादकांशी संपर्क साधला जात आहे. जिल्ह्यासाठी मुरबाड (कल्याण) तसेच तळोजा (रायगड) येथून लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. जिल्ह्यासाठी उपलब्ध होणाऱ्या 30 ते 35 टन लिक्विड ऑक्सिजनपासून सुमारे साडेतीन हजार जम्बो सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती होते. रुग्णसंख्येचा आकडा लक्षात घेता हा साठा 24 तासात संपतो.
ऑक्सिजन काटकसरीने वापरण्याच्या सूचना