महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 4, 2021, 4:32 PM IST

ETV Bharat / state

दुचाकी खडीवर घसरल्याने आई व मुलाचा एरंडोलमध्ये जागीच मृत्यू

एरंडोल येथील विद्यानगर येथे राहणारे तथा जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका असलेल्‍या कविता कृष्णकांत चौधरी (वय ३५) या मुलगा लावण्य चौधरी (वय १०) याला दुचाकी (एमएच १९ डीबी ८७७९) रोज शाळेत घेवून जात असतात. नेहमीप्रमाणे आजदेखील त्‍या मुलास शाळेतून घरी जात असताना नियतीने डाव साधला.

A mother and child died
A mother and child died

जळगाव -एरंडोल येथून बर्डी (जळू) येथे जिल्हा परिषदशाळेत नेहमी मुलाला सोबत घेवून जाणारी शिक्षिका असलेली आई आणि दहा वर्षीय चिमुकल्‍याला नियतीने एकाच वेळी परिवारापासून दूर केले. शहरापासून जवळच झालेल्या अपघातात आईसह मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली.

शाळेतून घरी जात असताना घडला प्रकार

एरंडोल येथील विद्यानगर येथे राहणारे तथा जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका असलेल्‍या कविता कृष्णकांत चौधरी (वय ३५) या मुलगा लावण्य चौधरी (वय १०) याला दुचाकी (एमएच १९ डीबी ८७७९) रोज शाळेत घेवून जात असतात. नेहमीप्रमाणे आजदेखील त्‍या मुलास शाळेतून घरी जात असताना नियतीने डाव साधला.

एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल

सकाळी दहाच्या सुमारास कविता चौधरी या मुलाला घेवून जात असताना ट्रक (जीजे २६ टी ८२६४)ने धडक दिली. या धडकेत आई व मुलगा ट्रकच्या मागच्या चाकाखाली आले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचे दृश्‍य पाहून अनेकांच्या अंगात थरकाप उडाला. शाळेतून घरी जाताना आई व मुलाचा मृत्‍यू झाल्‍याने अगदी क्षणात होत्‍याचे नव्हते झाले. अपघाताची माहिती मिळताच एरंडोलचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव, सहायक पोलीस निरीक्षक तुषार देवरे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. नागरिकांच्या मदतीने मृतदेह जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. दरम्यान ट्रक चालकाविरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौपदरीकरणाचे काम संथ

दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे काम संथ गतीने चालू असल्यामुळे या दोघा मायलेकांचा बळी गेला. या चौपदरीकरणाच्या कामामुळे आजवर अनेक लोकांचे अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. तर काहींना त्यांचे कायमस्वरूपी अवयव गमवावे लागले आहेत. याला जबाबदार ठेकेदार, प्रशासन की शासन याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details