Shingada Morcha in Pachora : पाचोरा येथे काँग्रेसच्या वतीने भव्य शिंगाडा मोर्चाचे आयोजन - भव्य शिंगाडा मोर्चा
सामान्य नागरिकांसाठी राज्य सरकारने मंजूर केलेले स्वस्त धान्य अद्यापही मिळाले नाही. ते तात्काळ नागरिकांना मिळावे. स्वस्त धान्य दुकान दररोज खुले करावे. दारिद्र रेषेखालील बीपीएल कुटुंबांना स्वस्त धान्य व इतर सवलती मिळाव्यात. विधवा परित्यक्ता दिव्यांग व्यक्तींचा बीपीएल योजनेत समावेश करावा, या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.
![Shingada Morcha in Pachora : पाचोरा येथे काँग्रेसच्या वतीने भव्य शिंगाडा मोर्चाचे आयोजन Shingada Morcha](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14793636-275-14793636-1647872041590.jpg)
Shingada Morcha
जळगाव -जिल्ह्यातील पाचोरा येथे काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यांसाठी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयावर भव्य शिंगाडा मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसचे नेते सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या शिंगाडा मोर्चात बैल गाडीवर ढोल वाजवत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
भव्य शिंगाडा मोर्चाचे आयोजन
सामान्य नागरिकांसाठी राज्य सरकारने मंजूर केलेले स्वस्त धान्य अद्यापही मिळाले नाही. ते तात्काळ नागरिकांना मिळावे. स्वस्त धान्य दुकान दररोज खुले करावे. दारिद्र रेषेखालील बीपीएल कुटुंबांना स्वस्त धान्य व इतर सवलती मिळाव्यात. विधवा परित्यक्ता दिव्यांग व्यक्तींचा बीपीएल योजनेत समावेश करावा. शेतकऱ्यांना विविध अनुदान व सुविधा शासनाने उपलब्ध करून द्याव्या. भिल आदिवासी तडवी समाजाच्या स्मशानभूमीचा जागेचा प्रश्न मार्गी लावावा. व तालुक्यातील ग्रामपंचायत व नगरपालिकेतील दिव्यांगांच्या निधीच्या गैरव्यवहाराची चौकशी करावी या मागणीसाठी या शिंगाडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. मागण्यांची त्वरित दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.