महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sister Molestation Case : सख्ख्या बहिणीचा विनयभंग करणाऱ्या भावाला तीन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा

सख्ख्या बहिणीचा विनयभंग करणाऱ्या ( Brother molested sister ) नराधम भावास जामनेर न्यायालयाने ( Jamner Court ) तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, ( Punishment for brother ) दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे.

Brother molested sister Case
भावाने बहिणीचा विनयभंग केला

By

Published : Aug 7, 2022, 3:29 PM IST

Updated : Aug 7, 2022, 5:14 PM IST

जळगाव - दारूच्या नशेत सख्ख्या बहिणीचा विनयभंग करणाऱ्या ( Brother molested sister ) नराधम भावास जामनेर न्यायालयाने ( Jamner Court ) तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, ( Punishment for brother ) दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे. जामनेर तालुक्यातील एका गावात 28 मार्च 2022 रोजी दारूच्या नशेत गाढ झोपेत असलेल्या बहिणीचा विनयभंग केल्याचा संताप जनक प्रकार घडला होता. दरम्यान पिडीतेने आरडा-ओरड केल्याने आईने नशेत असलेल्या नराधम भावाच्या तावडीतून तीला सोडवले. मात्र, इच्छे प्रमाणे मला करून दिल्याच्या कारणावरून नराधमाने बहिणीसह आईला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा -CBI action in NTPC company : सोलापुरात सीबीआयची एनटीपीसी कंपनीत कारवाई; सुरक्षा अधिकाऱ्याला लाख रुपये लाच स्वीकारताना पकडले

याबाबत पीडितेने थेट जामनेर पोलीस स्टेशन ( Jamner Police Station ) गाठून नराधम भावाविषयी तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित, तिच्या आईची साक्ष ही महत्वपूर्ण ठरली. दरम्यान जामनेर न्यायालयाने या खटल्यावर अतिशय शीघ्र गतीने कामकाज करत दोन महिने बारा दिवसात निकाल दिला.

हेही वाचा -Dhule Murder : धुळे हादरलं! पैसे उसनवारीच्या वादातून गोळी झाडून चिन्नू पोपलीची हत्या, दोघांना अटक

Last Updated : Aug 7, 2022, 5:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details