जळगाव -जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. रविवारी दिवसभरात पुन्हा 9 रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 266 इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील वेगवेगळ्या 7 शहरांमधील एकूण 88 संशयित रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला.
जळगाव जिल्ह्यातील भडगाव, जळगाव, चोपडा, अडावद, अमळनेर, पारोळा आणि पाचोरा येथील स्वॅब घेतलेल्या 25 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल जिल्हा प्रशासनाला रविवारी सायंकाळी प्राप्त झाले. यापैकी 16 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 9 रुग्णांचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भडगावचे 3, चोपड्याचे 4 तर जळगाव व पाचोरा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.