सातारा -जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील वडूजमध्ये असणाऱ्या जेसी शहा या पेट्रोल पंपावर पोलिसांनी काल(गुरुवार) सायंकाळी सहा वाजता कारवाई करत पेट्रोल पंप मालक व कामगार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक फायदा करून घेण्याच्या उद्देशाने काल सायंकाळी सहा वाजता अत्यावश्यक सेवेत नसणाऱ्या लोकांना जेसी शहा या पेट्रोल पंपावर पेट्रोल देत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
वडूजमध्ये शासनाच्या आदेशाचे उल्लंघन, पेट्रोल पंपाच्या मालकासह ८ जणांवर गुन्हा दाखल - लॉक डाऊन सातारा बातमी
जिल्हाधिकारी व शासनाच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही डिझेल व पेट्रोल विक्री करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, वडूज येथील जेसी शहा या पेट्रोल पंपावर याठिकाणी अत्यावश्यक सेवेत नसणाऱ्या काही जणांना पेट्रोल देत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी पेट्रोल पंपाच्या मालकासह इतर ८ जणांवर कारवाई केली आहे.
![वडूजमध्ये शासनाच्या आदेशाचे उल्लंघन, पेट्रोल पंपाच्या मालकासह ८ जणांवर गुन्हा दाखल पेट्रोल पंपाच्या मालकासह ८ जणांवर गुन्हा दाखल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6645662-986-6645662-1585905261419.jpg)
पेट्रोल पंपाच्या मालकासह ८ जणांवर गुन्हा दाखल
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हाधिकारी व शासनाच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही डिझेल व पेट्रोल विक्री करू नये असे आवाहन करण्यता आले आहे. मात्र, याठिकाणी अत्यावश्यक सेवेत नसणाऱ्या काही जणांना पेट्रोल देण्याचा प्रकार सुरू होता. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी पेट्रोल पंपाचे मालक विकल्प जवाहर शहा व अन्य ८ कामगार असे एकूण ९ जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.