जळगाव:जळगाव जिल्ह्यातील एकमेव बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत मंगळवारी 17 प्रभागांपैकी तेरा प्रभागांसाठी मतदान झाले. 15 हजार 438 मतदारांपैकी 11हजार 213 मतदारांनी मतदान केले. यात 5 हजार 238 महिला तर 5 1975 पुरुष मतदारांचा समावेश आहे.
Bodwad election : बोदवड नगरपंचायत निवडणुकीसाठी 72.50 टक्के मतदान
बोदवड नगरपंचायत (Bodwad Nagar Panchayat) निवडणुकीचे मतदान प्रक्रिया (Voting process) किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडली दरम्यान 17 जागांपैकी 13 जागांसाठी 72.50 % मतदान झाले सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली मात्र दिवसभर मतदान केंद्रावर मतदारांचा निरुत्साह पाहायला मिळाला तर अखेरच्या क्षणी मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
हिदायत नगर व शिवाजीनगर या ठिकाणी किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. तर प्रभाग क्रमांक सहा वरील ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या मतदान केंद्राची मशीन पंधरा मिनिटे बंद होते. मतदान केंद्रांवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी देखील भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच मतदानाला अवघे तीस मिनिटे शिल्लक असताना गर्दी झाली. सर्व पक्षांनी स्वबळावर ही निवडणूक लढल्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन व शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान शिवसेनेसाठी पोषक वातावरण असून बोदवड नगरपंचायती वर भगवा फडकेल असा विश्वास आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. मतदानाचा निकाल एक महिन्यानंतर लागणार आहे.