महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावमध्ये आज दिवसभरात 56 नवे कोरोनाबाधित, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1,165 वर - 56 corona positive jalgaon

जिल्हा प्रशासनाला आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये तब्बल 56 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात जळगाव शहर 4, भुसावळ 19, चोपडा 3, धरणगाव 9, यावल 5, जामनेर 13, रावेर 1, पारोळा 2 अशा एकूण 56 कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे.

अधिष्ठाता कार्यालय, corona update jalgoan
अधिष्ठाता कार्यालय

By

Published : Jun 8, 2020, 8:40 PM IST

जळगाव- जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू आहे. सोमवारी दिवसभरात पुन्हा 56 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 1 हजार 165 वर जाऊन पोहोचली आहे. जिल्ह्यात जळगाव शहरासह भुसावळात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक होत आहे. या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत.

जिल्हा प्रशासनाला आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये तब्बल 56 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात जळगाव शहर 4, भुसावळ 19, चोपडा 3, धरणगाव 9, यावल 5, जामनेर 13, रावेर 1, पारोळा 2 अशा एकूण 56 कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे.

जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसताना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही कमी होत नसल्याची स्थिती आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील 126 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यात 119 मृत्यू हे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेले आहे. त्याचप्रमाणे, पाचोरा 1, चोपडा 3, चाळीसगाव 1 आणि अमळनेर येथील 2 जणांच्या मृत्यूचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 165 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील 556 जणांनी कोरोनावर मात केली असून 483 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातही 45 रुग्ण अत्यवस्थ आहेत.

जामनेर तालुक्यातील तरुणाचा मृत्यू

सोमवारी कोरोनामुळे जामनेर तालुक्यातील एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याला 27 मे रोजी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा सोमवारी सकाळी 9 वाजता मृत्यू झाला. तो हृदयरोगाचा रुग्ण होता, असे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

त्याचप्रमाणे, धरणगाव तालुक्यातील 68 वर्षीय वृद्धाचा 7 जूनला, भुसावळ तालुक्यातील 70 वर्षीय वृद्धेचा 5 जूनला, रावेर तालुक्यातील 65 वर्षीय वृद्धाचा 7 जूनला मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. कोरोनासोबतच या सर्व रुग्णांची मेडिकल हिस्ट्री उच्च रक्तदाब, मधुमेह अशा आजारांची असल्याचेही त्यांच्या मृत्यूच्या कारणात समाविष्ट केले आहे.

कोरोना अपडेट

जळगाव शहर- 238

भुसावळ- 254

अमळनेर- 169

चोपडा- 63

पाचोरा- 35

भडगाव- 85

धरणगाव- 37

यावल- 55

एरंडोल- 23

जामनेर- 39

जळगाव ग्रामीण- 28

रावेर- 85

पारोळा- 23

चाळीसगाव- 17

मुक्ताईनगर- 9

बोदवड- 1

इतर जिल्ह्यातील- 4

एकूण- 1165

ABOUT THE AUTHOR

...view details