जळगाव - शहरातील पिंप्राळा स्मशानभूमी परिसरात बेकायदेशीर गावठी हातभट्टी रामानंद नगर पोलिसांनी उद्ध्वस्त करून पाच जणांना आज अटक केली आहे. गावठी दारू, देशीविदेशी दारू व साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
गावठी हातभट्टी उद्ध्वस्त करत जळगावात तिघांना अटक - jalgaon crime news today
गावठी हातभट्टी रामानंद नगर पोलिसांनी उद्ध्वस्त करून पाच जणांना आज अटक केली आहे. या धाडीत हजारो रूपयांची कच्चे रसायन, पक्के रसायन व गावठी दारू तसेच काही देशीविदेशी दारू आढळून आले आहे.
पाच जणांना अटक
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की शहरातील पिंप्राळा परिसरातील स्मशानभूमी परिसरात असलेल्या एका झोपडपट्टी वस्तीत बेकायदेशीर गावठी दारू बनविण्याची हातभट्टी सुरू असल्याची माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी मिळाली. गुप्त माहितीनुसार आज सकाळी ११च्या सुमारास पोलीस पथकासह पिंप्राळ्यात जावून धाड टाकली. या धाडीत हजारो रूपयांची कच्चे रसायन, पक्के रसायन व गावठी दारू तसेच काही देशीविदेशी दारू आढळून आले आहे. कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केली असून दारुचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात पाच जणांना अटक करण्यात आली.