जळगाव - जिल्ह्यातील चाळीसगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका नराधमाने चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार ( 4 Year Old Girl Raped ) केलाची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर पंचकृषीतील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
बलात्कार करणारा आरोपी नातलगच -
चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने जळगावच्या चाळीसगाव शहरात खळबळ उडाली आहे. वाईट कृत्य करणाऱ्या नराधमास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी हा नातलग असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यातच एका 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडल्याने पंचक्रोशीतून संतापाची लाट उमटू लागली आहे. नराधम पीडित मुलीच्या नात्यातला आहे. सावळाराम भानुदास शिंदे असे आरोपीचे नाव आहे. तो केवळ 26 वर्षांचा आहे. आरोपीने खाऊ घेऊन देण्याचे आमिष दाखवून चिमुरडीवर बलात्कार केला. त्यानंतर मुलीला तिच्या आईजवळ आणून सोडून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मुलीचे रक्ताने माखलेले कपडे पाहून मातेला शंका आली. त्यानंतर आईने आरडाओरड केली.