महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव: जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांत ३९६ कोरोनाबाधितांची नोंद - Increase in corona patients in Jalgaon district

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढू लागली आहे. सोमवारी दिवसभरात नव्याने ३९६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यात जळगाव शहरातील सर्वाधिक १४५ रुग्णांचा समावेश आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये जळगाव व चाळीगाव शहरातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांत ३९६ कोरोनाबाधितांची नोंद
जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांत ३९६ कोरोनाबाधितांची नोंद

By

Published : Mar 2, 2021, 2:40 AM IST

जळगाव -जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढू लागली आहे. सोमवारी दिवसभरात नव्याने ३९६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यात जळगाव शहरातील सर्वाधिक १४५ रुग्णांचा समावेश आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये जळगाव व चाळीगाव शहरातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ६१२७४ वर पोहचला असून, आतापर्यंत ५७१०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गेल्या चोवीस तासांमधील आकडेवारी

जळगाव शहर-१४५, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-३६, अमळनेर-१२, चोपडा-64, पाचोरा-१, भडगाव-५, धरणगाव-२, यावल-१, एरंडोल-१, जामनेर-२, रावेर-५, पारोळा-१५, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-१७, बोदवड-१२ आणि इतर जिल्ह्यातील ६ असे एकूण ३९६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details