महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा, दोन महिन्यांमध्ये ३७ जण ठार
एरंडोल आणि हिंगोणामध्ये झालेल्या अपघातांनी तर उभ्या महाराष्ट्राला धडकी भरवली होती. 23 डिसेंबर 2019 रोजी खराब रस्त्यामुळे रॉड तुटून ट्रक ऑटोवर आदळला होता. यात ९ जणांचे बळी गेले होते. त्यानंतर 2 जानेवारी 2020 रोजी हिंगोणामध्ये ट्रक आणि प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये झालेल्या अपघातात जागेवरच 12 जणांचा मृत्यू झाला होता. हे दोन अपघात समाजमनाला चटका लावणारे ठरले.
महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा, दोन महिन्यांमध्ये ३७ जण ठार
By
Published : Feb 26, 2020, 12:41 PM IST
|
Updated : Feb 26, 2020, 3:10 PM IST
जळगाव - जिल्ह्यातील जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्गावर गेल्या ६४ दिवसांमध्ये ३७ जणांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. वाळूची वाहने, भरधाव वेगाने जाणारे ट्रक, मद्यप्राशन करून वाहन चालविणारे चालक अक्षरश: नागरिकांच्या जीवावर उठले आहेत. काही ठिकाणी खराब रस्ते अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.
महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा, दोन महिन्यांमध्ये ३७ जण ठार
एरंडोल आणि हिंगोणामध्ये झालेल्या अपघातांनी तर उभ्या महाराष्ट्राला धडकी भरवली होती. 23 डिसेंबर 2019 रोजी खराब रस्त्यामुळे रॉड तुटून ट्रक ऑटोवर आदळला होता. यात ९ जणांचे बळी गेले होते. त्यानंतर 2 जानेवारी 2020 रोजी हिंगोणामध्ये ट्रक आणि प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये झालेल्या अपघातात जागेवरच 12 जणांचा मृत्यू झाला होता.
महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा, दोन महिन्यांमध्ये ३७ जण ठार
महामार्गावरील आहुजा नगरजवळ 18 जानेवारीला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत जळगाव शहरातील दाम्पत्य ठार झाले होते. याच दिवशी दूरदर्शन टॉवरजवळ भरधाव कंटेनरने दुचाकीस्वाराला तर कुसुंबा येथे एका विवाहितेला ट्रकने चिरडले. जिल्ह्यात सर्वाधिक अपघात वाळूचे डंपर आणि ट्रकमुळे झाले आहेत. महाराष्ट्रात अपघातात ठार झालेल्यांच्या आकडेवारीत जळगाव जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे.
यावर कारवाईचा आरटीओ आणि पोलीस निव्वळ देखावा करत आहेत. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनमालकांकडून पोलीस हप्ते घेतात. मुळात बेरोजगार असलेल्या तरुणांनी रोजगाराचे साधन म्हणून प्रवासी वाहतूक करणारी वाहने घेतली. काही वाहनांना सरकारने परवाने दिले. याच वाहनधारकांकडून पोलीस हप्ते गोळा करतात. नियमांचे उल्लंघन केले तर कारवाई व्हायलाच हवी, पण हप्तेखोरी कशासाठी? असा सवाल या वाहनधारकांकडून केला जात आहे.
या अपघातांमध्ये ४० वर्षांच्या आतील नागरिकांच्या मृत्यूची संख्या जास्त आहे. घरातील कर्ता पुरुष ठार झाल्याची आकडेवारीही जास्त आहे. समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागणे, याला कारणीभूत आहे.