जळगाव - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी ३३४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यात सर्वाधिक ९० पॉझिटिव्ह रुग्ण हे एकट्या जळगाव शहरातील आहेत. दुसरीकडे, शुक्रवारी दिवसभरात १० रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, शुक्रवारी २०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. त्यात जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर ९०, जळगाव ग्रामीण १४, भुसावळ १८, अमळनेर १९, चोपडा ७, पाचोरा ४०, भडगाव १४, धरणगाव ३२, यावल १, एरंडोल ९, जामनेर ३२, रावेर ७, पारोळा २, चाळीसगाव ४०, मुक्ताईनगर ७ आणि दुसऱ्या जिल्ह्यातील १ असे एकूण ३३४ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे.
हेही वाचा -राज्यात शुक्रवारी ९ हजार ६१५ कोरोनाबाधितांची नोंद, २७८ मृत्यू